चमत्कारांचे ३० दिवसनमुना

माशांची दुसरा चमत्कारिक पकड
ही दुसरी वेळ होती की येशूने मासे धरण्यात पेत्राला मागे सोडले. पण यावेळी गोष्ट वेगळी होती, कारण ही घटना येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानानंतर घडली होती. मासे पाहून पेत्राचा प्रतिसाद तितका उत्साही नव्हता, जितका उत्साही तो तेव्हा झाला होता जेव्हा त्याने किनाऱ्यावर येशूला पाहिले. तो आपल्या नावेतून उडी मारतो आणि आपल्या प्रिय रब्बीला भेटायला धावत जातो. येशूने शिजवावे म्हणून माशांनी भरलेले जाळे ओढत किनाऱ्यावर आणत असतांना पेत्र आणि इतर शिष्य आपला पुनरुत्थित त्रात्यास पाहून स्तब्ध विस्मयाने भरून गेले होते.
या भोजनानंतर येशू पेत्राला शिष्य म्हणून पुनर्स्थापित करतो आणि मंडळीचा आधारस्तंभ आणि ख्रिस्ताचा प्रेषित म्हणून त्याच्या पुढील जीवनासाठी निर्देश देतो. देवाने त्याला त्याच्या जीवनाचे ध्येय सोपवले आहे आणि एका नवीन ऋतूत सुरूवात दिली आहे.
आपल्याला मिळणारे किंवा आपण ज्याचा भाग आहोत असे प्रत्येक चमत्कार आपल्याबद्दल कधीच नसते. ते नेहमीच येशूची ओळख करून देण्यासाठी आणि पृथ्वीवरील त्याच्या राज्याच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी असतात. देवाची इच्छा आहे की आपल्या आरोग्याचा, सुटकेचा आणि पुनर्स्थापनेच्या कथांचा उपयोग करून अनेकांना त्याच्या राज्यात आकर्षित करावे. येशूने दुसऱ्याच्या जीवनात काय केले आहे हे ऐकल्यानंतर येशूमध्ये एक चुंबकीय गुण आहे! हे साक्षीचे सामर्थ्य आहे. बारा शिष्य प्रत्यक्षदर्शी होते पण आपण जीवनाचे साक्षीदार आहोत. आपले जीवन देवाच्या महान सामर्थ्याचे आणि पराक्रमाचे साक्षीदार आहे.
पौलाने म्हटल्याप्रमाणे, आपल्याला ख्रिस्ताचा सुगंध आपल्या सभोवताली पसरवण्यासाठी एका विजयी मिरवणुकीत नेले जात आहे! सुगंधाचे वैशिष्ट्य हे असते की त्याला खूप प्रयत्न करावे लागत नाहीत, ते फक्त असते. तुम्हाला फक्त तुमची कहाणी सांगावी लागते आणि येशूसारखे जगावे लागते जेणेकरून लोकांस तुमच्यावर त्याचा वास दरवळत असल्याचा अनुभव येईल. बाकीचे देव करतो!
देवाने तुमचा चमत्कारासाठी पात्र म्हणून उपयोग करावा म्हणून तुम्ही तयार आहात का? तुम्ही तुमची कहाणी इतराना सांगण्याची आणि देवाला सर्व गौरव देण्याची संधी स्वीकाराल का?
येशूच्या चमत्काराची सेवा पाहण्याचा हा ३० दिवसांचा प्रवास पूर्ण करत असताना तुम्ही ही प्रार्थना कराल का की येशूला तुमच्या जीवनात चमत्कारिक काम करण्यासाठी आमंत्रित करेल?
प्रिय स्वर्गीय पित्या,
तुझ्या पुत्राला, येशूला, पृथ्वीवर पाठवल्याबद्दल तुझे उपकार मानतो. त्याच्या अलौकिक सामर्थ्याबद्दल आणि अधिकाराबद्दल मी तुझी स्तुती करतो, जी आजही पवित्र आत्म्याद्वारे पृथ्वीवर कार्य करत आहेत. माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागात तुला आमंत्रित करतो, यासाठी की तुला माझ्याठायी आणि माझ्याद्वारे अशक्य गोष्टी करता याव्या आणि गौरव प्राप्त व्हावे. मी माझ्या कार्यात तुझ्यासोबत भागीदार होऊ इच्छितो आणि माझ्या जीवनाद्वारे तुझी उद्दिष्टे साध्य होताना पाहू इच्छितो. मी प्रार्थना करता की माझ्या सर्वसाधारण, दैनंदिन जीवनात तुला अलौकिक चमत्कार करतांना पाहण्यासाठी तू माझे डोळे उघडावेस,
पित्या, पुत्रा आणि आत्म्या, मी तुजवर प्रीती करतो.
हे सर्व मी येशूच्या सामर्थ्यवान नावाने मागतो,
आमेन.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in