YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारांचे ३० दिवस

30 पैकी 28 दिवस

येशू बेथानी येथे लाजराला जिवंत करतो

जेव्हा येशूचा एक मित्र खूप आजारी असतो आणि त्याच्या मृत्युशय्येवर असतो, तेव्हा तुम्ही अपेक्षा कराल की तो सर्वकाही सोडून त्याला भेटायला जाईल. त्याऐवजी, येशू जेथे आहे तेथेच जास्त वेळ राहतो आणि नंतर लाजर मरण पावतो तेव्हा तो मरीया आणि मार्थाला भेटायला जातो.

तो ज्या गावाच्या वेशीवर मार्था त्याला भेटते त्या गावाच्या प्रवेशद्वारावर जातो आणि ती त्याला इशारा करते की तो आताही काही करू शकतो, तिच्या भावाच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी. मरीया येशूकडे धावते आणि त्याच्या पाया पडते आणि रडत म्हणते की जर तो येथे असता तर तो मरण थांबवू शकला असता. सर्वत्र दुःख पाहून येशूला अश्रू अनावर होतात आणि नंतर तो कबरेकडे जातो आणि मोठ्या आवाजात लाजराला बाहेर बोलावतो. लाजर त्याच्या मृतदेहावर वापरलेल्या तागाच्या वस्त्राच्या पट्ट्यांमध्ये अजूनही गुंडाळलेला बाहेर पडतो. येशूने स्वतःच्या मृत्यू आणि पुनरुत्थानापूर्वीच मृत्यूवर आपले सार्वभौमत्व प्रगट केले. तो पृथ्वीवर आपल्या जीवनाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा आहे. जीवनाची सुरूवात व शेवट कधी करायची हे तोच ठरवू शकतो. लाजर त्याच्या जिवंत झाल्यानंतर पृथ्वीवर सदाकाळ जगला नाही परंतु येशूने लोकांना पूर्ण पुरावा दिला की तो पुनरुत्थान व जीवन आहे. आजही, जीवनात आणि मृत्यूमध्ये आपण सर्व लोकांपेक्षा सर्वाधिक धन्य आहोत कारण जगणे म्हणजे ख्रिस्त आहे आणि मरणे हा लाभ आहे. जेव्हा आपण जगतो तेव्हा ते देवाच्या गौरवासाठी असते आणि जेव्हा आपण मरतो तेव्हा आपण त्याच्यासोबत अनंतकाळ घालवतो. कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही! किती अद्भुत आश्वासन!

यामुळे येशूकडे तुम्ही कसे पाहता याविषयीचा तुमचा दृष्टिकोन कसा बदलतो? येथे पृथ्वीवरील तुमच्या जीवनाकडे तुम्ही कसे पाहता याविषयीचा तुमचा दृष्टिकोन कसा प्रभावित होतो? आपल्यापैकी काही जण कोणावरही परिणाम न करता आणि अनंतकाळाचा कोणताही विचार न करता आपले जीवन जगतात. आपण झोम्बीसारखे जगतो आणि फिरतो. आता वेळ आली आहे की आपण येशूची आज्ञा वैयक्तिकरित्या स्वीकारावी आणि ती प्रेतवस्त्रे काढून खरोखर जगू या!

या योजनेविषयी

चमत्कारांचे ३० दिवस

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in