चमत्कारांचे ३० दिवसनमुना

पाण्याचा द्राक्षारस
आजच्या शास्त्रवाचनात, आपण येशूच्या पहिल्या चमत्कारांबद्दल वाचतो. काना नावाच्या एका लहान आणि जास्त परिचित नसलेल्या गावात एका लग्नात हे घडून आले. लग्नाच्या मेजवानीत, द्राक्षारस विपूल असायला हवा होता म्हणजे प्रत्येकाला हवा तितका मिळाला असता. दुर्दैवाने अथवा सुदैवाने, या लग्नात द्राक्षारस संपला. येशूची आई मरीया हीने, येशूला परिस्थितीबद्दल माहिती दिली, फक्त त्याने तिला शांत राहण्यास सांगितले, कारण त्याची वेळ आली नव्हती, किंवा ती आली होती का?
परमेश्वराचा पुत्र येशू, याला त्याची वेळ केव्हा येईल हे माहित होते, पण ती त्या लग्नाच्या दिवशी नव्हती.मातृत्वाच्या विशिष्ट अंतःप्रेरणेने, मरीयेने चांकरांना तिच्या मुलाने त्यांना जे काही करायला सांगितले ते करावयास सांगितले. मला असे वाटते की गेल्यामागील काही वर्षांत, येशूने त्याच्या आईला सांसारिक गोष्टींबाबत चमत्कार करून विस्मित केले होते, म्हणून ती काहीही करावयास तयार दिसत होती. येशू त्याच्या आईच्या अंतःप्रेरणेनुसार वागला आणि चाकरांना यहुदी लोकांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेल्या रांजणात पाणी भरण्यास सांगितले. त्यांनी पाण्याने रांजण भरल्यानंतर, त्याने त्यांना त्यातून काही काढून यजमानाकडे घेऊन जाण्यास सांगितले. रांजणात पाणी ओतल्यापासून ते भोजनकारभाऱ्याने चाखले तोपर्यंत काहीतरी अद्भुत घडले होते. ही जादूगाराची युक्ती किंवा भोजनकारभाऱ्याची काही फसवेगिरीची युक्ती असू शकत नाही कारण द्राक्षरस चाखताना चमत्कार अनुभवला गेला होता. भोजनकारभाऱ्याने सांगितले की हा द्राक्षरस त्याने दिवसभर चाखलेल्या द्राक्षरसात सर्वोत्तम होता!व्वा! द्राक्षारसाचा पुरावा त्याच्या चवीत होता. काही क्षणांतच, येशूने त्याच्या शिष्यापुढे त्याचे परमेश्वरत्व सिद्ध केले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि त्याचे गौरव प्रकट झाले. पुढील ३० दिवस पुढे चालत असतांना, आशा आहे की तुम्हाला त्याचे गौरव तुमच्यासमोर प्रकट होताना दिसून येईल. तुम्हाला आढळतील त्या अतिशय सामान्य आणि गूढ अलौकिक गोष्टींमधून. देवाचे गौरव तुम्हाला आश्चर्यचकित करेल, तरीही ते तुम्हाला सांत्वन देईल आणि देवाची इच्छा असल्यास, त्याच्यावर खोल आणि कायमचा विश्वास पुन्हा स्थापित व्हावा.
येशूच्या प्रारंभीच्या सेवेतील या लहानश्या भागासाठी आणखी एक मनोरंजक बदल म्हणजे तो आता सेवेत प्रवेश केल्यापासून आत्मिक क्षेत्रात अधिक खोलवर बदल कसा कुशलतेने आणि सोप्या पद्धतीने व्यक्त करतो. येशू अनेकदा “नव्या बुधल्यांमध्ये नवीन द्राक्षारस” या उपमाबद्दल बोलत असे, ज्याचा उपयोग त्याने त्याच्या अभिषेकामुळे लोकांमध्ये होणाऱ्या नवीन कार्याच्या संबंधी केला. लग्नातील या घटनेवरून स्पष्टपणे दिसून येते की येणाऱ्या शतकांमध्ये ते कसे दिसू लागेल. यहुद्यांच्या हातपाय धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडी रांजणात आता उत्तम द्राक्षारस असायचा जो तो पिणाऱ्या सर्वांच्या हृदयाला आनंदित करणार होता.त्या काळातील सांस्कृतिक संदर्भात द्राक्षारस हा आनंद आणि भरभराटीचे प्रतीक मानला जात असे. येशूने स्वतः आपल्या शब्दांत सांगितले की, माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत (योहान १५:११). येशूने स्वतःबद्दल शत्रूशी तुलना करताना असेही म्हटले (योहान १०:१०)की, “चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.” काना येथील लग्नात येशूने पाण्याचा द्राक्षारस केला, तो फक्त लग्नासाठी मदत म्हणून नव्हता. याद्वारे तो आपल्याला एक गंभीर संदेश देतो - की खरी आनंदी आणि समाधानी जीवनशैली आपल्याला त्याच्याद्वारेच मिळते, जुन्या धार्मिक परंपरांद्वारे नाही.जो कोणी येशूचे अनुसरण करण्याची निवड करतो, तो नवीन बनतो. “जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.” (२ करिंथ ५:१७)
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in