चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारिक मंदिर कर
गळदोरीवर पकडलेल्या पहिल्या माश्याच्या तोंडात नाणे असणे किती अशक्य आणि आश्चर्यकारक आहे आणि तेही पेत्र आणि येशूसाठी कर भरण्यासाठी नक्की रक्कम असणे? विलक्षण आहे ना? पेत्र स्तब्ध झाला असेल आणि तरीही त्याने आज्ञा पाळली आणि त्या चमत्काराचा फायदा घेतला.
अलीकडे देवाने तुम्हाला कोणते कठीण काम करावयास सांगितले आहे? तुम्ही त्याची आज्ञा पाळली का किंवा तुम्ही त्याच्या बेफाम विनंतीचे पालन करण्याइतके प्रतिष्ठित आहात का?
देव आपल्याला त्याचे अनुसरण करण्यास पाचारण करतो आणि असे करताना आपल्याला वारंवार आपला वधस्तंभ वाहून नेण्यास सांगतो. वधस्तंभ वाहून नेणे म्हणजे आपल्या स्वतःच्या देहास आणि महत्त्वाकांक्षेस मरणे आणि रोजच्या प्रत्येक क्षणी देवासाठी जगणे. हे एक उच्च आवाहन आहे आणि दुर्बळ उत्साही लोकांसाठी नाही! त्यासाठी आपण देवाची वाणी ऐकली पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे आणि त्याच्या वचनानुसार जगले पाहिजे. जर आपण त्याच्या आज्ञांचे उल्लंघन करीत राहिलो तर आपण अलौकिक गोष्टींची अपेक्षा करू शकत नाही.
देव आपल्याला आपल्यावर असलेल्या मानवी अधिकारांच्या अधीन राहण्याचे पाचारण करतो. तो सदाचाराच्या वा नैतिकदृष्ट्या अशा प्रकारे जगण्यास सांगतो की ज्यामुळे देवाचा सर्व प्रकारे आदर होईल. त्याची इच्छा आहे की आपण आपल्या राष्ट्रांचा कर भरावा आणि आपल्या देशाचे विश्वासू नागरिक म्हणून जगावे आणि त्याचबरोबर आपण सर्वकाळ स्वर्गाचे नागरिक आहोत हे लक्षात ठेवावे. दैनंदिन जीवनातील सर्व बाबींमध्ये अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी तुम्ही देवाचे वचन वाचण्यास सुरुवात कराल का? तुमच्यासाठी सोयीस्कर आणि आरामदायक असलेल्या गोष्टी सोडून द्याव्या लागल्या तरी तुम्ही तुमच्या जीवनात त्याच्या सार्वभौम इच्छेनुसार जगाल का?
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in