YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारांचे ३० दिवस

30 पैकी 24 दिवस

येशू जन्मतः आंधळ्या माणसाच्या डोळ्यांवर थुंकून त्याला बरे करतो

जेव्हा तुम्ही योहान ९ संपूर्ण वाचाल तेव्हा तुम्हाला आढळेल की या विशिष्ट उपचाराने बरेच प्रश्न निर्माण केले आणि समाजातील सर्व स्तरांचे लक्ष वेधले गेले. जन्मतः आंधळ्या असलेल्या माणसाच्या डोळ्यांवर येशूने वाळू आणि लाळेचा लेप लावला व त्याला शिलोहच्या तळ्याजवळ डोळे धुण्यासाठी पाठवले तेव्हा तो बरा झाला. परूश्यांनी बरे होण्याच्या प्रक्रियेची पूर्ण तपासणी केली आणि येशूला पापी म्हणून दोषी ठरवले. दुर्दैवाने, त्या माणसाच्या आईबापाने स्वतःला चमत्कारापासून दूर ठेवले यासाठी की त्यांना सभास्थानातून बाहेर काढले जाऊ नये. त्या माणसाला अखेरीस यहूदी मंडळीतून बाहेर काढले जाते आणि तो येशूला पुन्हा भेटतो आणि यावेळी तो तारणाचा अनुभव घेतो.

तारण म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या अंध डोळे आणि तारणारा आणि त्याचे राज्य पृथ्वीवर येण्याची सुवार्ता ऐकण्यासाठी बहिरे कान उघडणे, या गोष्टीतील चमत्कार म्हणजे केवळ एका माणसाला शारीरिक दृष्टी मिळणे नव्हे तर येशू सुरुवातीपासून शेवट पाहू शकतो. त्याचे शिष्य त्याला विचारतात की या माणसाच्या जन्मजात दोषासाठी कोणाचे पाप जबाबदार होते ज्याचे उत्तर येशूने दिले.

“ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.श्काही गोष्टी केवळ आपल्यासोबतच का घडतात याची खोली केवळ देवच जाणतोे आणि केवळ आपल्या फायद्यासाठी ते कसे कार्य करतील हे केवळ तोच पाहू शकतो. ही एक मुक्तीदात्याची व्याख्या आहे- जो मुक्ती प्राप्त करता येणार नाही असे भासणारे काहीही घेऊ शकतो आणि त्यातून काहीतरी सुंदर घडवू शकतो. यशया संदेष्ट्याने जेव्हा मशीहाच्या कारकिर्दीचे वर्णन केले तेव्हा जो राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालतो त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल देतो. हे फक्त तेथेच थांबत नाही परंतु देव आपण जे नवीन उत्पत्ती त्याचा उपयोग करून नवीन निर्मितीचा वापर करीत आहे, उध्वस्त झालेल्या आणि नष्ट झालेल्या गोष्टी पुन्हा निर्माण करतो, पुनर्स्थापित करतो आणि नवीनीकृत करतो. अशाप्रकारे सर्व पृथ्वीला दाखविण्यासाठी देवाचे गौरव प्रगट केले जाते.

आपल्यासोबत घडलेल्या सर्वात वाईट गोष्टी सोडवण्यास आणि आपल्या जीवनातील तुटलेल्या तुकड्यांसह काहीतरी मौल्यवान बनवण्यासाठी आपला देवावर विश्वास आहे का?

पवित्र शास्त्र

या योजनेविषयी

चमत्कारांचे ३० दिवस

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in