चमत्कारांचे ३० दिवसनमुना

येशू १८ वर्षांपासून कुबडी असलेल्या एका स्त्रीला बरे करतो
ही अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री होती ज्यामुळे ती कुबडी झाली होती. कुबडी झाल्यामुळे आणि सरळ होऊ न शकल्यामुळे तिला किती त्रास सहन करावा लागला असेल. येशूने तिला या दुरात्म्याच्या बंधनातून मुक्त केले आणि ती पुन्हा सरळ उभी राहू शकली. सरळ उभे राहून पुन्हा जग पाहणे - किती अनपेक्षित देणगी!
आपल्यापैकी बरेच जण मानसिक, शारीरिक, भावनिक, नातेसंबंधात्मक आणि आर्थिकदृष्ट्या वाकलेले आहेत आणि ईश्वरी आत्मविश्वासाने आपले डोके वर काढू शकत नाहीत. उलट आपण आयुष्यात पराभूत होऊन रेंगाळत आहोत! आपण नैराश्य, चिंता, भीती, चिंता आणि असुरक्षिततेमुळे बांधले गेलो आहोत, ज्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला घडविण्यात आले आहे त्या गोष्टींवर कार्य करण्यास आापण असमर्थ आहोत. देव आपल्याला शत्रूच्या तावडीतून मुक्त करण्याची इच्छा करतो जेणेकरून आपण देवाची मुले म्हणून आपल्याला स्थिर उभे राहता यावे!
तुम्हाला कधीही असे वाटले आहे की तुम्ही तुमचे जीवन सुरळीत करण्याचा, त्यात सुधार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. आपल्याला स्पर्श करावा म्हणून आपल्याला येशूच्या हाताची गरज भासू शकते कारण तो वाकड्या गोष्टी सरळ बनवण्यात तज्ञ आहे. वाकड्या मणक्यापासून, तुटलेल्या लग्नापर्यंत, विचलित मन किंवा विस्कळीत झालेल्या कुटुंबापर्यंत- कोणतीही गोष्ट त्याला स्पर्श करणे, रूपांतर करणे आणि पुनर्स्थापित करणे अशक्य नाही. तुम्ही त्याला त्याच्या स्वतच्या अनोख्या आणि सामर्थ्यवान मार्गाने गोष्टी सुरळीत करण्याची परवानगी द्याल? तुम्ही पुन्हा कधीही पूर्वीसारखे होणार नाही. लक्षात ठेवा, तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in