YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारांचे ३० दिवस

30 पैकी 22 दिवस

येशू एका गैर-यहूदी स्त्रीच्या भूतग्रस्त मुलीला बरे करतो

या घटनेबद्दल आपण वाचतो तेव्हा, सुरुवातीला येशूने या गैरयहूदी स्त्रीशी वापरलेली कठोर भाषा आपल्याला थोडी धक्कादायक वाटते. पण नीट पाहिल्यावर लक्षात येते की येशू त्या स्त्रीचे हेतू उघड करत होता आणि तिच्या विश्वासाचे मूल्यांकन करीत होता. येशू खरोखरच स्पष्टपणे बोलणारा होता!

जेव्हा त्याने असे म्हणून तिच्या विनंतीस नकार दिला आणि म्हटले की तो फक्त “इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांसाठी” आला आहे, तेव्हा ती आली आणि त्याच्यासमोर गुडघे टेकून तिने त्याला मदत करण्यास विनंती केली. तिने मुखाने आणि भौतिकरित्या तिच्या परिस्थितीवर त्याचे प्रभुत्व दाखवले. जेव्हा तो म्हणाला की मुलांसाठी असलेली भाकरी घेऊन तो कुत्र्यांना देऊ शकत नाही, तेव्हा ती लगेच रूपकात्मक गाडीवर स्वार झाली आणि तिने त्याला आठवण करून दिली की कुत्री देखील मेजावरून पडणाऱ्या तुकड्यांवर समाधान मानतील. कुत्र्याशी तुलना केल्याच्या अपमानाकडे कानाडोळा करणे किती नम्रपणाचे आहे आणि त्याच्या सामर्थ्यवान शब्दांचे तुकडे देखील तिच्या मुलीला सोडवू शकतात असे म्हणण्याद्वारे येशूवरील तिचा कसा विश्वास प्रगट झाला येशूने तिच्या “मोठा विश्वासाबद्दल” तिची वाखाणणी केली आणि तिच्या मुलीला आरोग्य मिळाले!

येशू फक्त चांगले वागणाऱ्या, चांगले बोलणाऱ्या आणि चांगले दिसणाऱ्या लोकांसाठी आला नव्हता तर तो प्रत्येक पुरुष, स्त्री आणि मुलासाठी आला होता, त्यांची सांस्कृतिक, वांशिक आणि सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो. तो सर्वांना बंधमुक्त करावयास आला होता. फक्त एकच अट होती ती म्हणजे नम्र आणि पश्चात्तापी अंतःकरण जे त्याला सर्वांचा प्रभु बनवण्यास तयार असेल. अटी अत्यंत सोप्या आहेत आणि तरीही गर्व आणि हट्टीपणामुळे बरेच लोक त्याबाबत चुकतात.

तुम्हीही या स्त्रीप्रमाणे येशूसमोर गुडघे टेकून त्याला मदत करण्यास विनवाल का? नम्रतेने गुडघे टेकून मदत आणि पुनर्स्थापनेच्या सर्वोच्च स्रोताकडे पाहण्यासाठी व्यक्तीस बलवान होण्याची गरज भासते.

या योजनेविषयी

चमत्कारांचे ३० दिवस

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in