YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारांचे ३० दिवस

30 पैकी 27 दिवस

येशू अंजिराचे झाड सुकवतो

अंजिराचे झाड फळ देत नव्हते आणि म्हणून त्याला येशूचा संताप सहन करावा लागला. मजेदार गोष्ट म्हणजे ते लगेच सुकून गेले, इतक्या लवकर की ते सर्वांच्या लक्षात आले आणि काय झाले याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. येशूने तेव्हा आणि आता आपल्या शिष्यांना अशा गोष्टींसाठी धैर्याने मागण्याची विनंती केली ज्या व्यावहारिकदृष्ट्या अशक्य वाटतात. कोण डोंगर समुद्रात बुडवतो आणि तरीही तो म्हणतो की जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी हे शक्य आहे.

आज तुमच्यासाठी हे आव्हान आहे:

‘तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल.’

तुम्ही कशासाठी प्रार्थना करत आहात? तुम्ही जे मागत आहात ते देव तुम्हाला देईल असा तुमचा विश्वास आहे का?

शंका हीच काय ती एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला अलौकिक अनुभव घेण्यापासून रोखते. जर आपण अशा धाडसाने विश्वास ठेवला ज्याने शत्रूला धक्का बसला आणि आपल्या देवाला उत्साहित केले तर काय होईल? जर आपण अशा मोठ्या प्रार्थना केल्या ज्या आपल्या स्वप्नांच्या पलीकडे होत्या आणि आपल्या स्वतःच्या बळाने साध्य होऊ शकल्या नाहीत तर काय? जर आपल्या प्रार्थना केवळ आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबांसाठी नसून आपल्या शहरांसाठी आणि राष्ट्रांसाठी असतील तर काय?

आपल्याजवळ प्रार्थनेचे उत्तर देणारा परमेश्वर आहे ज्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. विश्वाच्या परमेश्वरासाठी वेदना, कर्ज, वंध्यत्व किंवा एकाकीपणाचा तो डोंगर काहीच नाही. येशूच्या नावाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आणि ख्रिस्तामध्ये हो आणि आमेन असलेल्या देवाच्या वचनांवर उभे राहून तुम्ही प्रार्थनेद्वारे तुमच्या जीवनातून हे दूर करू शकता.

देव जो आहे असे म्हणतो तसा तो आहे असा तुम्ही विश्वास धराल का?

तुम्ही देवाच्या अलौकिक सामर्थ्याचा परिचय देणाऱ्या धाडसी प्रार्थना करायला सुरुवात कराल का?

या योजनेविषयी

चमत्कारांचे ३० दिवस

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in