YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 21:4-11

योहान 21:4-11 MARVBSI

मग पहाट होत असता येशू समुद्रकिनार्‍यावर उभा होता; तरी तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नाही.” त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडेल; म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “हा प्रभूच आहे.” “प्रभू आहे” हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कंबरेला गुंडाळून घेतला, (कारण तो उघडा होता) आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत ओढत होडीतून आले, (कारण ते किनार्‍यापासून दूर नव्हते, सुमारे दोनशे हातांवर होते). मग किनार्‍यावर उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.” शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्‍यावर ओढून आणले; तितके असतानाही जाळे फाटले नाही.

संबंधित व्हिडिओ