YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारांचे ३० दिवस

30 पैकी 29 दिवस

येशू महायाजकाच्या सेवकाचा कान बरा करतो

येशूला अटक करून नेले जात आहे, त्याचे शिष्य घाबरले आहेत, पेत्र कोठूनतरी तलवार काढतो आणि मलखाच्या कानावर प्रहार करतो. हा इसम महायाजकाचा सेवक असल्याने अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत आला होता. या दुःखद रात्री त्याला चमत्कार होईल असे कदाचित वाटले नसेल पण पेत्राने त्याचा एक कान कापून टाकला होता आणि येशू हात पुढे करून त्याचा कान बरा करतो!

फक्त येशूच एखाद्याला त्याच्या सर्वात अंधाऱ्या क्षणी बरे करू शकत होता. अशा वेळी आपल्यापैकी कोणालाही दुसऱ्या कोणाचा विचार आला नसता. येशूने रक्तबंबाळ झालेल्या आणि जखमी माणसाला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला आणि क्रूर वधस्तंभावर त्याची जागा घेण्यापूर्वी त्याला बरे केले. येशूप्रीत्यर्थ बोलण्यासाठी कोणीही वेळ काढला नाही. एकही व्यक्ती नाही. त्याच्याद्वारे बरे झालेल्या किंवा सुटका पावलेल्या लोकांपैकी एकही नाही. तो एकटा सोडून देण्यात आला, आपल्यासाठी त्याला मारहाण करण्यात आली, त्याचा विश्वासघात करण्यात आला, गैरवापर करण्यात आला आणि छळ करण्यात आला. त्याने आपली पापे वाहून न्यावीत, आपले अपराध त्याच्याकडे हस्तांतरित करण्यात आले जेणेकरून आपणास दोषमुक्त होता यावे. व्वा!

देवाला कधीही तुमचा त्रास वाटत नाही. बाकीचे जग गोंधळातअसतानाही तुम्ही त्याला हाक मारू शकता आणि तो तुम्हाला असे उत्तर देईल जणू त्याला हाक मारणारे फक्त तुम्हीच आहात. इतर गरजांच्या तुलनेत तुमची गरज क्षुल्लक आणि कमी वाटू शकते परंतु तरीही तुम्ही त्याला हस्तक्षेप करण्यास आणि मदत करण्यास विनंती केली पाहिजे.

जर तुम्ही कधीही मागितले नसेल आणि म्हणून तुम्हाला ते कधीच मिळाले नसेल तर? जर तुम्हाला वाटत असेल की बाकीच्या दुःखी जगात त्याला तुमचे दुःख दिसणार नाही आणि म्हणून त्याने त्याच्यावर विसंबून राहिला नाही तर?

देव तुमच्यासाठी कधीही व्यस्त नसतो, त्याच्या मूल्यवान मुला! तो थकवा किंवा आजारपणामुळे झोपत नाही किंवा डुलकी घेत नाही. तो सर्वसमर्थ आहे आणि नेहमीच उपलब्ध असतो. प्रश्न असा आहे की - तुम्ही त्याच्याकडे झुकणार का? तुम्ही त्याला हाक माराल का?

या योजनेविषयी

चमत्कारांचे ३० दिवस

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in