YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारांचे ३० दिवस

30 पैकी 23 दिवस

येशूने बहिऱ्या आणि मुक्या माणसाला बरे केले

बहिरा आणि मुका. किती दुःखद संमिश्र अवस्था! त्या माणसाच्या सोबतीला अनेक वर्षे फक्त कानठळ्या बसवणारा शांतपणा होता. तो बोलू शकत नव्हता आणि इतर लोक काय बोलत आहेत ते ऐकू शकत नव्हता. बाजारपेठेतील गजबजणारे गर्दीचे आवाज त्याच्या कानापर्यंत कधी पोहोचले नाहीत, आणि मनातल्या गोष्टी कोणाला सांगण्याची त्याला संधी मिळाली नाही. कल्पना करा की सगळे विचार डोक्यात उसळी मारत असतांना तुमच्या स्वतःच्या शरीरात अडकून राहतात! सुदैवाने, त्याच्या आजूबाजूला एक असा समुदाय होता ज्याने त्याला येशूकडे आणले आणि त्याला बरे करण्याची विनंती केली. स्वतःहून त्याने येशूविषयी कधी ऐकले नसते, त्याची शिकवण ऐकली नसती.

येशूने या प्रसंगी उपचाराची एक अनोखी पद्धत वापरली. त्याने त्या माणसाच्या कानात आपली बोटे घातली आणि थुंकून त्याच्या जीभेला स्पर्श केला. आपल्याला हे विचित्र किंवा अगदी घाणेरडे वाटेल, पण सृष्टीकर्त्यासाठी तसे नव्हते. तो आपल्या स्वरूपात निर्माण केलेल्या माणसाला मूळ स्थितीत परत आणत होता. त्या माणसाच्या शरीरात झालेली बिघाड दुरुस्त करत होता.

आपण प्रामाणिक असू याआपण खूप गोंधळलेले असतो. जेव्हा आपण येशूसाठी जगायला सुरुवात करतो, तेव्हा पवित्र आत्म्याचे काम खूप कठीण असते. तो आपल्याला अनेक सवयी, चुकीचे मार्ग आणि चुकीच्या गोष्टी विसरायला आणि सोडायला शिकवतो. मग तो आपल्या आतून एक नवा बदल आणि पुनर्बांधणी सुरू करतो.

याची किल्ली आहे आपण त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक कोपऱ्यात मोकळे स्थान द्यायला हवे - जरी तो कोपरा अंधारलेला किंवा वाईट वाटत असला तरी. ज्याने आपल्याला निर्माण केले आणि पाचारण केले, तो आपल्या सोबत खड्ड्यात उतरायला घाबरत नाही. तो आपल्या आयुष्यातील सगळी घाण, गोंधळ आणि अपवित्रता काढून टाकतो.

तुम्ही या माणसासारखे देवासमोर उभा राहाल का आणि त्याला तुझ्याबरोबर त्याच्या इच्छेनुसार काम करू द्याल का? त्याच्या उपस्थितीत पुनर्स्थापना नक्की मिळते, पण ती कोणत्या पद्धतीने होईल - हे त्याच्या हाती आहे.

पवित्र शास्त्र

या योजनेविषयी

चमत्कारांचे ३० दिवस

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in