मंग ती बाईनी दखं की, आते आपण दपु नही शकतस म्हणीन घाबरीन कापत कापत ईसन त्याना समोर पडनी, मी कोणता कारणमुये याले स्पर्श करा अनी कशी लगेच बरी व्हयनी, हाई तिनी सर्व लोकसना समोर सांगी टाकं. तवय येशु तिले बोलना, “बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे, सुखरूप जाय.”