त्याच घटकाले येशुनी बराच लोकसले रोग, आजार अनं दुष्ट आत्मा ह्यासपाईन मुक्त करं, अनी बराच आंधयासले दृष्टी दिधी. मंग त्यानी योहनना त्या निरोपीसले उत्तर दिधं, तुम्हीन ज्या गोष्टी दख्यात अनं ऐक्यात त्या योहानले जाईसन सांगा; “आंधया डोळस व्हतस,” पांगया चालतस, कोडी बरा व्हतस, बहिरा ऐकतस, मरेल ऊठतस, अनं “गरीबसले सुवार्ता सांगामा येस.”