चमत्कारांचे ३० दिवसनमुना

येशू त्याच्या वस्त्राला स्पर्श करणाऱ्या अनेकांना बरे करतो
येशूद्वारे असे सामर्थ्य प्रसारित होत होते की लोक त्याच्या वस्त्राच्या काठास स्पर्श करून बरे होत. तो पूर्णपणे मानव असूनही पूर्णपणे दैवी असूनही, त्याच्या सामर्थ्याचा स्रोत पित्याशी असलेला त्याचा सतत संवाद होता. गेनेसरेत येथे उतरण्याच्या या वेळेपूर्वी, तो डोंगरावर एकटाच प्रार्थना करत होता. तो खाली येतो, पाण्यावरून चालतो आणि नंतर किनाऱ्यावर पोहोचतो. तो देहधारी परमेश्वर होता आणि त्यामुळे त्याच्यात सर्वाेच्च सामर्थ्य कार्य करीत होते, हो, पण मानव असण्याचा अर्थ असा होता की आपल्याला जाणवणारा थकवा आणि दौर्बल्य त्याने देखील अनुभवले. लोकांना बरे करण्यासाठी, त्यांना बंधमुक्त करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी तो ज्या प्रकारे उत्साहित राहिला ते देव पित्याशी असलेल्या त्याच्या शांत निट सान्निध्याच्या काळात दिसून आले. त्या काळात येशूने स्वतःला मजबूत केले आणि प्रत्येक दिवसासाठी पित्याच्या हृदयात काय आहे ते ऐकले. येशू त्याच्या पित्याच्या इच्छेस समर्पित होता आणि त्यामुळे त्याला अद्भुत सामर्थ्य लाभले.
जर आपणही पित्याशी नाते जोडण्यासाठी अशा समपर्णाने दररोज जगलो तर काय होईल? लक्षात ठेवा की येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान यामुळे, आपल्यालाही तेच सामर्थ्य लाभले आहे जे त्याला मृतांमधून उठवण्यासाठी त्याच्यामध्ये कार्य करत होते, आज आणि दररोज. जर प्रार्थनेमुळे हे सामर्थ्य सक्रिय होते, तर आपण आपल्या प्रार्थना जीवनात अधिक शिस्त का पाळत नाही? जर त्याला पूर्णपणे शरण जाणारे जीवन जगणे ही या सामर्थ्याचा वापर करण्याची गुरुकिल्ली आहे, तर आपल्याला आपले जीवन त्याच्यासमोर अर्पण करण्यापासून काय रोखत आहे?
देवाचे सामर्थ्य आणि उपस्थिती इतरांपर्यंत पोहोचविणारे सामर्थ्यवान जीवन जगण्यासाठी, आपण केवळ पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली असले पाहिजे. तोच आपल्याला पित्याच्या इच्छेनुसार अनिर्वाच्य कण्हण्याने प्रार्थना करण्याचे सामर्थ्य देतो आणि तो आपल्याला येशूमध्ये असलेल्या आपल्या अमर्याद वारशाची जाणीव करून देतो. हे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींबद्दल अंतर्दृष्टी देते आणि तुम्हाला नवीन आध्यात्मिक अधिकारासह जगण्यास मदत करते.
जेव्हा तू देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यासाठी त्याच्याकडे झुकतोस, तेव्हा तू त्याला विचारशील का - “प्रभु, मला तुझ्या सामर्थ्याने भर, जेणेकरून मला भेटणाऱ्या प्रत्येकाला तुझा अनुभव घेता येईल”?
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in