चमत्कारांचे ३० दिवसनमुना

येशू पाण्यावर चालतो
पाण्यावर चालता येत नाही. ही खरी गोष्ट आहे. आपण माणसे पाण्यावर चालू शकत नाही, आणि जर प्रयत्न केला तर बुडणार. फक्त शिमोन पेत्रानेच एकदा असा प्रयत्न केला आणि तो जिवंत राहून ती गोष्ट सांगू शकला. येशू मात्र वेगळा होता - कारण सृष्टीच्या सुरुवातीला पाण्यावर तरंगणारा आत्मा तोच होता, विश्वाचा निर्माणकर्ता असल्यामुळे त्याच्याकडे ते सामर्थ्य होते. तो पाण्याच्या रेणूंचा पृष्ठभाग ताण बदलू शकला आणि त्यावर चालू शकला कारण त्यानेच प्रत्येक अणू आणि रेणू निर्माण केला होता आणि तोच सर्व काही निर्माण करेल. देवासमोर काहीही अशक्य नाही कारण तो विश्वातील प्रत्येक गोष्ट सांभाळून धरतो.कलस्सैकर १:१५,२० ची मेसेज बायबलची आवृत्ती याची पुष्टी करते...
कलस्सैकर १:१५-२० (मेसेज बायबलमधून):
“आपण या पुत्राकडे पाहतो आणि अदृश्य देवाला पाहतो. आपण या पुत्राकडे पाहतो तेव्हा देवाचा मूळ हेतू प्रत्येक निर्मितीत दिसतो. कारण प्रत्येक गोष्ट, संपूर्णपणे प्रत्येक गोष्ट, स्वर्गातील व स्वर्गाखालील, दिसणारी असो किंवा अदृश्य, देवदूतांच्या एकामागून एक श्रेणी . सगळ्याचा आरंभ त्याच्यामध्ये झाला आणि सगळ्याला त्याच्यामध्ये हेतू सापडतो.” तो सर्व गोष्टी निर्माण होण्याआधीच होता आणि आजपर्यंत सर्व काही त्यानेच एकत्र सांभाळून धरले आहे. आणि जेव्हा मंडळीची (विश्वासूंच्या समुदायाची) गोष्ट येते, तेव्हाही तोच तिला सुव्यवस्थित करतो आणि टिकवून ठेवतो - जसे डोके शरीराला नियंत्रित करते. आरंभापासून तोच सर्वश्रेष्ठ होता आणि पुनरुत्थानाचा मार्ग दाखवत तो शेवटपर्यंतही सर्वश्रेष्ठच राहतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तोच आहे - सर्वोच्च, परमश्रेष्ठ.तो इतका विशाल आहे, इतका मोठा आहे की देवाचे सर्व काही त्याच्यामध्ये योग्य जागी बसते आणि तरीही गर्दी होत नाही. एवढेच नव्हे, तर या संपूर्ण विश्वातील सगळे तुटलेले आणि विस्कटलेले भाग - लोक असोत, वस्तू असोत, प्राणी असोत किंवा अगदी अणूही - हे सर्व त्याच्या वधस्तंभावर वाहिलेल्या रक्तामुळे योग्य रीतीने जोडले जातात आणि उत्साही सुसंवादांनी एकत्र जुळून येतात.
सर्व जीवनाचा कर्ता येशू, पाण्यावर सहजतेने चालू शकतो हे अर्थपूर्ण वाटते. आपल्यासारखा साधा माणूस, पेत्र, येशूवर आपली नजर ठेवून असाच प्रयत्न करू शकतो हे प्रभावी आहे. आपल्या नावेतून पाऊल बाहेर टाकूून अज्ञात प्रदेशात जाण्यापासून आपल्याला काय रोखत आहे? ज्या क्षणी आपण आपल्या आराम क्षेत्रातून बाहेर पाऊल टाकतो आणि देवाने आपल्यासाठी ठरवलेल्या ठिकाणी चालायला सुरुवात करतो त्याच क्षणी चमत्कार घडून येतो. जेव्हा तुम्ही तुमची दृष्टी येशूवर खिळवून ठेवता आणि त्याच्याकडे ती डळमळीत पावले टाकता, तो तुमच्यासमोरचा मार्ग सरळ करू लागतो आणि अशक्य गोष्टी घडवून आणतो. तुम्ही तुमच्या नावेत बसून येशू येण्याची वाट पाहत आहात का? कदाचित तुम्ही उभे राहून तो तुम्हाला जिथे घेऊन जात आहे त्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. चमत्कार तुमची वाट पाहत आहे!
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in