YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारांचे ३० दिवस

30 पैकी 19 दिवस

येशू ५००० लोकांना जेवू घालतो

कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास-पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांना बसवा.” १५त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले. १6तेव्हा त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. १७तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले, आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले.

फक्त पाच भाकऱ्या आणि दोन मासे यांसारख्या थोड्याशा जेवणाने पाच हजारांहून जास्त लोकांना कसं काय खाऊ घालता येईल? बरे, येशूला त्या पिकनिकला आमंत्रित करा. या चमत्कारिक जेवणाचे सौंदर्य यात आहे की येशूने जे उपलब्ध होते तेच वापरले. त्यासाठी शिष्यांना सोने किंवा चांदीची किंमत मोजावी लागली नाही. फक्त त्यांना येशूचे ऐकून लोकांना बसवायचे होते आणि मग त्याने वाढवून दिलेले अन्न वाटायचे होते. येशूने सर्व उचलण्याचे काम केले आणि याकडे लक्ष दिले की त्या दिवशी कोणीही उपाशी राहू नये!

गर्दीलाखाऊ घालण्याआधी फक्त एकच गोष्ट येशूने केली, ती म्हणजे त्याने डोळे स्वर्गाकडे उचलले, आपल्या पित्याचे अन्नाबद्दल आभार मानले, नंतर त्याने भाकर तोडली. अनेकदा, चमत्कार आधीपासूनच आपल्या जीवनात असतो. आपल्याला देवाकडे कृतज्ञतेने ते अर्पण करण्याबाबत आणि त्याला तोडू देण्याबाबत संकोच वाटतो, जेणेकरून ते वाढून अनेकांना आशीर्वाद देऊ शकेल. ते आपले पैसे, आपली स्वप्ने, आपली मालमत्ता किंवा आपली प्रतिभा आणि क्षमता असू शकते ज्या गोष्टी आपण खूप जोपासतो आणि देवाच्या हाती सोपवण्यास नकार देतो नाहीतर तो ते आपल्यापासून हिरावून घेईल अशी भीती आपल्याला वाटते.

आपण हे विसरून जातो की, मूलभूतपणे, आपल्याकडे जे काही आहे सर्व काही देवाकडून आहे, आणि म्हणून ते त्याचे आहे. पृथ्वीवरील आपल्या अल्पकाळासाठी आपण त्याचे फक्त कारभारी आहोत. म्हणून जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या अत्यंत खालची परिस्थितीत पोहोचतो तेव्हा आपण नम्रतेने देवाकडे जावे आणि उपकारस्तवनात त्याला उंचविण्यासाठी आणि तोडले जाण्यासाठी व वाटले जाण्यासाठी त्याच्या बलवान हातात स्वतःस सोपविण्यासाठी आम्हास काय हवे ते त्याला विचारावे. हे सोपे नसेल, पण मौल्यवान आहे!

या योजनेविषयी

चमत्कारांचे ३० दिवस

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in