आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो, व ते जलांना दुभागणारे होवो.” असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलांना वेगळे केले; आणि तसे झाले. देवाने अंतराळाला ‘आकाश’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस. मग देव बोलला, “आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय होवो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो;” आणि तसे झाले.
उत्पत्ती 1 वाचा
ऐका उत्पत्ती 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 1:2-9
8 दिवस
तुम्ही कधीच एकटे नाही. तुम्ही एका दिवसापासून किंवा 30 वर्षांपासून तुमच्या ख्रिस्ती विश्वासात आहात, असाल. जीवन तुम्हाला ज्या गोष्टींचे आव्हान देऊ शकते त्या सर्वांसाठी हे सत्य ठामपणे उभे आहे.. या योजनेत देवाची मदत प्रभावीपणे कशी स्वीकारावी हे शिका. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या “या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
12 दिवस
जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ