चमत्कारांचे ३० दिवसनमुना

रक्तस्त्रावी स्त्री
प्राचीन यहूदी समाजात स्त्री म्हणून जगणे खूप कठीण होते. पण मासिक पाळीचा विकार असणे तर अजून वाईट होते, कारण त्यामुळे सतत रक्तस्राव होत अस, ज्यामुळे ती अशुद्ध मानली जायची आणि तिला धार्मिक ठिकाणी किंवा इतर सामूहिक जमावात जाण्याची मनाई होती. घरातही, अशा स्त्रीला लेवीय नियमांनुसार शुद्ध लोकांशी संवाद साधता आला नसता किंवा किंवा वस्तूंना स्पर्श करता आला नसता. तिचा हात एखाद्या वस्तूला किंवा माणसाला लागला तरी ते अशुद्ध मानले गेले असते.
म्हणून, हे सुंदर आहे की तिच्या बरे होण्यासाठी स्पर्श हाच कारण ठरला. फक्त एवढी कल्पना करणेही की या रब्बीच्या स्पर्शाने, जो आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यांना बरे करत होता, ती देखील बरी होईल इतका धाडसी विश्वास तिच्यात होता की तिने येशूकडून सामर्थ्य खेचून घेतले. त्याच्याकडून निघालेले ते सामर्थ्य पाहून येशू आजूबाजूला पाहू लागला, की कोणी त्याच्याकडून ते घेतले. तिच्या आरोग्यस्थितीमुळे ती देवाच्या हस्तक्षेपासाठी अशक्य उमेदवार होती, तरी देवाच्या दृष्टीने ती तितकीच योग्य होती जितकी धार्मिकदृष्ट्या शुद्ध असलेली व्यक्ती.बारा वर्षांपासूनदुर्लक्षित आणि लोकांसमोर अदृश्य असलेल्या या स्त्रीला, येशूने सार्वजनिकरित्या स्वीकारले आणि इतक्या धाडसी विश्वासाच्या कृतीचे श्रेय तिला देणे हे पाहणे अद्भुत आहे.
तुमच्या दुषित भूतकाळामुळे, अनैतिक निवडींमुळे किंवा लाजिरवाण्या आरोग्यदशेमुळे तुम्ही स्वतःला येशूकडून आरोग्य प्राप्त करण्यास अपात्र ठरवले आहे का? जेव्हा तुम्ही नम्र आणि पश्चात्तापी अंतःकरणाने येशूकडे येता तेव्हा तो तुम्हाला त्याच्या कृपेने झाकून टाकतो आणि तुम्ही त्याच्यासमोर सरळ उभे राहू शकता, तुमच्यासाठी सांडलेल्या त्याच्या रक्तामुळे नीतिमान गणले जाऊ शकता. म्हणून, आता ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही (रोम ८:१). म्हणून त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करण्यासाठी धाडसी पाऊल उचला आणि त्याच्या सामर्थ्याला तुमच्यामध्ये त्याचे कार्य करू द्या.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in