चमत्कारांचे ३० दिवसनमुना

येशू मुक्या माणसाला बरे करतो
तुला कधी फ्लूमुळे किंवा एखाद्या संगीताच्या कार्यक्रमात मोठ्याने गाऊन आपला आवाज बसल्यासारखे झाले आहे का? ऐकू न येण्याची ती भावना खूप अस्वस्थ करणारी असते. आणि जेव्हा तुमच्याकडे बोलण्यासाठी खूप काही असते आणि तुम्ही आपले विचार बोलून सांगू शकत नाही, तेव्हा ते आणखीच अस्वस्थ करणारे असते.
येशू एका माणसाला भेटला जो भूतबाधा झाल्यामुळे मुका होता आणि त्याने त्याला मुक्त केले.तो माणूस बोलू लागला आणि त्याच्या सभोवतालची गर्दी थक्क झाली. आजही शत्रू आपल्याला गप्प करण्यासाठी हाच डाव खेळतो. तो आपल्याला दोषी ठरवून आणि आपण अपुरे आहोत असे आपल्याला वाटू लागते. तो अन्यायाच्या क्षणी आपल्याला मूक ठेवतो. तो येशूच्या नावाने आपल्याजवळ असलेला आत्मिक अधिकार काढून घेतो आणि वारंवार धमकावून आणि घाबरवून आपल्याला शांत बसवतो. तो आपल्या जीवनात निराशा आणतो आणि आपल्या तोंडातून निघणारे गाणे कोंडतो. येशू आपल्याला शत्रूच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आला. तो मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला जेणेकरून आपण शत्रचे टोमणेआणि धमक्या शांत करू शकू आणि आपला आध्यात्मिक आवाज पुन्हा जागा करू शकू. जेव्हा तुम्ही निराशेला तोंड देत असतानाही गाणे निवडता तेव्हा तुम्ही देवाला तुमचा आवाज पुनर्स्थापित करण्याची परवानगी देता. जेव्हा तुम्ही वंचितांसाठी बोलण्याचा निर्णय घेता, तेव्हा तुम्ही देवाला पुन्हा तुमचा आवाज वापरण्याची परवानगी देता. जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने आणि रक्ताने नवीन अधिकारासह, आरोग्य, शांती, आनंद यासारख्या शत्रूने तुमच्याकडून हिरावून घेतलेल्या सर्व गोष्टी परत मिळवता, तेव्हा तुम्हाला तुमचा आवाज परत मिळतो.
देवाची इच्छा आहे की तुमच्या आवाजात विश्वासाचा स्वर असावा, उपासनेत तो उंचवला जात असता आणि आग्रही प्रार्थनेमुळे बंधने तोडली जावीत व दारे उघडावीत. आता शत्रूला तुम्हाला गप्प बसवविण्याची मुभा देऊ नका!
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in