चमत्कारांचे ३० दिवसनमुना

येशू दोन आंधळ्या माणसांना बरे करतो
जर मुलांसोबत राहिला असाल, तर तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवणाऱ्या प्रौढ व्यक्तीवर त्यांचा जन्मजात विश्वास अनुभवास येईल. त्या मोठ्या माणसावर जो त्यांच्यासोबत वेळ घालवतो. मुलासारख्या विश्वासाची गोडी अशी आहे की तो फक्त विश्वास ठेवतो. त्यात अट नसते. तो गुंतागुंतीचा नसतो. तयात गाजावाजा नसतो. हाच गुण या दोन आंधळ्या माणसांच्या बरे होण्यामध्ये दिसतो. त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही पण ते चमत्कारासाठी आतुर होते हे स्पष्ट होते. येशू त्यांना एक काहीसा आश्चर्यकारक प्रश्न विचारतो, “मी हे करू शकतो असा तुला विश्वास आहे का?” हे आश्चर्यकारक आहे कारण जर त्यांनी त्याला सार्वजनिकरित्या हाक मारली आणि त्याच्या दयेची विनंती केली तर हे स्पष्ट होते की तो त्यांना बरे करू शकतो.
पूर्णपणे अंध असलेल्या व्यक्तीला बरे करण्यामागील विज्ञान हे दर्शविते की एकदा दृष्टी गेली की ती परत मिळवणे अशक्य असते आणि जर पूर्वी कधीही दृष्टी नसेल तेव्हा ते आणखीच कठीण असते. संपूर्ण जगाचा निर्माता येशू, परिपूर्ण २०/२० दृष्टीसह या दोन्ही माणसांना त्यांच्या मूळ रचनेत पुनर्स्थापित करणार होता. त्याने त्यांचे शारीरिक डोळे उघडण्यापूर्वी तो मज्जातंतू पुन्हा स्थापित करणार असेल, रक्तवाहिन्यां पुनस्थितीत आणत असेल आणि मज्जातंतूंचा मार्ग तयार करत असेल. फक्त देवच करू शकतो! फक्त निर्माणकर्ताच शून्यातून निर्मिती करू शकतो! फक्त निर्माणकर्ताच शून्यातून मार्ग काढू शकतो.
तुम्ही कोणत्या देवाच्या आकाराच्या चमत्काराची वाट पाहत आहात? अशी कोणती अशक्य गोष्ट आहे जी फक्त देवच बदलू शकतो? तुमच्याजवळ असा साधा बालकासमान विश्वास आहे का जो तुमच्या उत्पन्नकर्त्याच्या हाकेला उत्तर देईल आणि “हो, मला विश्वास आहे की तुम्ही हे करू शकता” असे म्हणेल?
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in