चमत्कारांचे ३० दिवसनमुना

भुते काढून डुकरात पाठविली जातात
शांतीचा राजकुमार एका क्षणात भुतांच्या सैन्याने पछाडलेल्या माणसाची सुटका करतो. ज्याला आवरता येत नसे, जो कबरांत राहत असे आणि जो अस्वस्थ होता तो दुरात्म्याच्या ताब्यातून मुक्त होतो आणि एक सुज्ञ, समंजस आणि आध्यात्मिक व्यक्ती बनतो. कसा चमत्कार आहे! तरीही, या माणसाची मानसिक आणि शारीरिक स्थिती बरी झाल्याचे पाहून, लोक ते सहन करू शकले नाहीत. रानटी डुकरांच्या कळपाच्या नाशावर ते इतके अडकून पडले होते की ज्याने एका माणसाला सर्वात वाईट प्रकारच्या बंधनातून मुक्त केले होते त्याकडे त्यांना पाहता आले नाही. कदाचित त्यांना या सुटकेचा अर्थ त्यांना समजला नाही. येथे एक देवाचे प्रतिरूप धारण करणारा होता ज्याला सैतानाने इतके गांजले होते की तो स्वतःलाच इजा करीत होता. जर येशूने हस्तक्षेप केला नसता तर त्याचे काय झाले असते हे आपल्याला माहित नाही.
देवाला त्या क्षेत्रातील शंभर डुकरांपेक्षा त्याच्यावर ओरडणाऱ्या एका विस्कळीत जीवन असलेल्या माणसाची जास्त काळजी होती.
येशू आपल्याला जीवन देण्यासाठी आला होता. हे साधारण, कसेबसे निभावून नेलेले, किमान गोष्टींवर भागलेले आयुष्य नाही, तर विपूल जीवन आहे. असे जीवन जे प्रत्येक पातळीवर निरोगी आणि फलदायी आहे - आतून (आत्मा आणि प्राण) ते बाहेरपर्यंत (आपले शरीर). आपल्या जीवनाचा प्रत्येक पैलू देवासाठी महत्त्वाचा आहे; त्याच्या स्पर्शासाठी कोणतेही क्षेत्र इतके लहान नाही. नेहमीच, आपल्या अनेक शारीरिक आजारांचा संबंध आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीशी असतो. म्हणून जेव्हा आपण येशूला आतून सुरुवात करून प्रत्येक पातळीवर आपल्याला बरे करण्यासाठीहाक मारतोतेव्हा ते आपल्यासाठीच चांगले ठरते. तो ते करायला सुरुवात करतो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या शरीरातील प्रत्येक भाग कसा बरा आणि निरोगी वाटू लागतो.
येशूने ज्या माणसाला दुरात्म्यापासून सोडवले त्याला दहा शहरांमध्ये (डेकापोलिस) सुवार्तेचा प्रचार करण्याचे काम दिले. कोणी विचार केला असेल की एक आधीचा भूतग्रस्त व्यक्ती सुवार्तिक होऊ शकतो का? फक्त येशूच आपल्या जीवनाच्या अवशेषांमधून आपली किंमत परत देऊ शकतो आणि आणि उद्देश आणू शकतो. आज तुम्ही त्याच्याकडे धावून जाल का आणि त्याला सांगाल का की तुम्हाला त्याची किती गरज आहे?
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in