YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारांचे ३० दिवस

30 पैकी 15 दिवस

याईरच्या मुलीला मेलेल्यातून उठवणे

तुमच्या प्रार्थनांना देवाने उशिरा प्रतिसाद दिल्यामुळे तुम्ही कधी अस्वस्थ झाला आहात का?रक्तस्त्राव झालेल्या स्त्रीला बरे करण्यासाठी येशू याईरच्या घरी जाताना मध्ये थांबला तेव्हा याईरलाही असेच वाटले असेल. गर्दीत कोणी त्याला स्पर्श केला आहे हे तपासण्यासाठी येशूला वेळ घालवताना पाहून त्याला किती निराशा झाली असेल याची कल्पना करा. याईरला ओरडून विचारायचे असेल की कोणीही असेल तर त्याने लवकरात लवकर सांगावे जेणेकरून ते त्याच्या घराच्या दिशेने जाऊ शकतील, जेथे त्याचे मूल मृतावस्थेत पडले होते. या विलंबामुळे त्याच्या मुलाचा जीव गेला, पण त्याला हे माहित नव्हते की ही जीवन बदलणारी साक्ष देण्याची दैवी योजना आहे.

तुम्ही प्रार्थनेसाठी खूप काळ थांबता, किंवा कामावर बढती मिळायला होत असलेला उशीरयापैकी काहीही निरुपयोगी नाही! देव नेहमीच कामावर असतो.. तो तुमच्या सभोवतालचे आणि तुमच्यामधले सगळे धागे जोडत असतो. जेथे मार्ग नाही असे दिसते तेथे तो मार्ग तयार करतो अरण्यात मार्ग तयार करून आणि तुमच्या कल्पनाशक्ती आणि नियंत्रणाच्या पलीकडे गोष्टी घडवून आणून.

या कथेतून आपण काही शिकायचे असेल तर ते म्हणजे जेव्हा येशू जीवनाच्या प्रवासात आपल्यासोबत असतो, तेव्हा अचानक येणाऱ्या किंवा अगदी दुःखद परिस्थितीतही, ज्या आपल्याला पूर्णपणे हादरवून टाकतात, आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. त्याला त्या घटनांबद्दल आश्चर्य वाटत नाही, खरे तर तो आता पूर्वीपेक्षा जास्त जबाबदार आहे. तुमच्या कानात कितीही आवाज येत असले तरी, त्याचा आवाज “भिऊ नकोस, विश्वास मात्र ध.” असे म्हणणारा असेल. सभोतालच्या कोलाहलात त्याची कुजबुज ऐकण्यासाठी आपण स्वतःला शांत करायची आणित्याच्यासोबत एकांतात राहायची निवड करण्याचा निर्णय आपला आहे. जेव्हा तुम्ही वेळेवर येणाऱ्या देवावर विश्वास ठेवता तेव्हा विलंब निराशाजनक नसतो. विलंब हे देवाशी सतत भेटण्याचे दैवी क्षण असू शकतात.

पवित्र शास्त्र

या योजनेविषयी

चमत्कारांचे ३० दिवस

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in