चमत्कारांचे ३० दिवसनमुना

येशू बेथसदा येथे एका आजारी माणसाला बरे करतो
तुमच्यासमोर कधी अशी परिस्थिती आली आहे का, जेथे तुम्हाला पुढे जाण्याची किंवा प्रगती करण्याची संधीच मिळाली नाही?
अडतीस वर्षे आजारी असलेला तो माणूस अशाच स्थितीत होता. कदाचित त्याला त्याच्या अपंगत्वाची सवय झाली असेल आणि दररोज इतर अपंगांसोबत राहत असल्याने त्याच्या जीवनात त्याच्या वाटेस आलेल्या दुःखास शरण जाण्याची भावना वाढीस लागली असावी.
आपण अनेकदा ही वचने वाचतो आणि त्या माणसावर सबबी सांगण्याचा आरोप करतो, पण खरे म्हणजे, देवदूत पाणी हलवत असे त्या दुर्मिळ क्षणावाचून त्याला पाण्यात उतरण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. येशू तेथे प्रवेश करेपर्यंत ते निराशाजनक वाटत होते. येशू त्याला भेटतो आणि त्याची कहाणी ऐकून, तत्क्षणी त्याला बरे करतो. येशूची आज्ञा थोडीशी त्रोटक वाटते:“ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” परंतु हे अगदी बरोबर वाटते की ज्या माणसाला आतापर्यंत बाजेवर पडून राहण्याशिवाय काहीही करता येत नव्हते, त्याला त्याच्या बरे होण्यात सहभागी होण्यासाठी निर्णायक आणि जाणूनबुजून काहीतरी करण्यास सांगितले गेले. येशू एवढ्यावरच थांबत नाही, पण काही काळानंतर जेव्हा तो त्या माणसाला भेटतो तेव्हा तो त्याला पाप करणे सोडण्यास सांगतो यासाठी की त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडू नये. येशू त्या माणसाला निष्क्रिय जीवनशैलीतून बाहेर काढून स्वतःमध्ये शिस्त आणि देवाच्या जाणीवेकडे पाचारण करत असल्याचे दिसते.
कधीकधी आपण स्वतःला मर्यादित पर्यायांसह एका कोपऱ्यात अडकलेले पाहतो. ते अनपेक्षित आरोग्य निदान, नोकरी गमावणे किंवा नातेसंबंधातील अडथळा असू शकते. ते काहीही दिसत असले तरी, तुम्हाला तुमची स्थिती बदलण्याची संधी मिळाली नसेल, परंतु जेव्हा तुम्ही येशूला हस्तक्षेप करण्यासाठी बोलावता तेव्हा तो तुम्हाला तुमच्या चमत्कारात सहभागी होण्यास आमंत्रित करतो. यशया संदेष्टा लिहितो की देव राजा कोरेशच्या पुढे जाऊन त्याला बंदिवासात असलेल्या इस्राएलमध्ये पुनर्स्थापना आणण्यास मदत करेल. कोरेशला आज्ञापालन करीत
ठाम पावले उचलावी लागतील, जेणेकरून देव त्याच्यापुढे जाईल आणि त्याला त्याच्या सर्व कामांमध्ये यश मिळेल. तसेच हे तुमच्या आयुष्यातही घडू शकते - बरे होण्यासाठी काही ठराविक पावले उचलणे, समेट करण्यासाठी प्रयत्न करणे, किंवा देव जसे मार्गदर्शन करतो तशी प्रार्थना करणे. देव तुला जे काही करायला सांगतो त्याकडे दुर्लक्ष न करता जेव्हा तुम्ही ते कराल, तेव्हा तुम्हाला येशूसोबत भागीदारीचा चमत्कार दिसू लागेल.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in