तवय मी त्या देवदूतकडे जाईन, ती धाकली गुंडाळी माले दे अस सांगं, तो माले बोलना, “हाई ले अनी खाई टाक; हाई तुनं पोट कडू करी टाकी पण तुना तोंडमा ते मधनामायक गोड लागी.”
तवय मी देवदूतना हातमातीन ती धाकली गुंडाळी लिधं अनं खाई टाकं; ती मना तोंडमा मधनामायक गोड लागनं, तरी ते खावानंतर मनं पोट कडू व्हयनं.