मी फक्त त्यासनाकरता नही, तर त्यासना संदेशसवरतीन ज्या मनावर ईश्वास ठेवतस त्यासनाकरता बी प्रार्थना करस. यानाकरता हि प्रार्थना करस की त्या सर्वासनी एक व्हवाले पाहिजे; हे पिता, जसं तु मनामा अनं मी तुनामा शे तसं त्यासनी बी आपलामा एक व्हवाले पाहिजे, यानाकरता की तु माले धाडेल शे असा ईश्वास जगनी धराले पाहिजे.