चमत्कारांचे ३० दिवसनमुना

येशू छतावरून खाली सोडलेल्या पक्षाघाती व्यक्तीला बरे करतो
ही चार पुरुषांची खरी कहाणी आहे ज्यांच्या विश्वासाने येशूला त्यांच्या पक्षाघाती मित्राला बरे करण्यास प्रेरित केले. त्यांच्या मित्राला येशूसमोर सादर करण्यासाठी त्यांची नाविन्यपूर्णता आणि चातुर्य पाहणे आश्चर्यकारक आहे. घराचे छप्पर उघडून येशूसमोर त्याला त्याच्या पलंगावर उतरवण्याद्वारे ते एक विशिष्ट निकड दाखवतात.
तुम्ही छतावरील पथकाचा भाग आहात का? कठीण परिस्थितीमुळे स्वतःला वर उचलू न शकणाऱ्या लोकांना उचलून येशूकडे आणणारी व्यक्ती? प्रगती, चमत्कार, उपचार किंवा मदतीची गरज असलेल्या मित्रांसाठी तुमची दृढ मध्यस्थी सर्व फरक करू शकते. अनेकदा, जीवनात आपण निराशा आणि हताशेपुढे गुडघे टेकवतो, प्रार्थना एक दूरचे स्वप्न ठरते. प्रार्थना करणारे मित्र असण्याने मदत मिळते जे तुम्हाला उचलून धरतात आणि तुमच्या विनंत्या धैर्याने आणि तत्परतेने देवासमोर मांडतात.
तुमच्याकडे प्रार्थना करणाऱ्या मित्रांचे मंडळ आहे का ज्यांनी तुम्हाला देवाच्या सिंहासनकक्षात उचलून न्यावे यासाठी तुम्ही अवलंबून राहू शकता, जेव्हा तुम्ही स्वतःस त्याठिकाणी नेऊ शकत नाही? देवाला असे विश्वासू मित्र मिळावेत अशी विनंती करणे चांगले आहे जे कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत प्रवास करतील.
तुम्ही इतरांसाठी निःस्वार्थपणे प्रार्थना करता त्या प्रार्थना तुमच्या स्वर्गातील पित्याला आनंदित करतात. तो प्रत्येक शब्द ऐकतो, प्रत्येक अश्रू पाहतो आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक माराल तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईल कारण तो तुमच्या विश्वासात आनंदी होतो.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in