चमत्कारांचे ३० दिवसनमुना

शताधिपतीच्या चाकराचे बरे होणे
शताधिपती यहूदी नव्हता तरीही तो येशूचे सामर्थ्य आणि अधिकार समजला होता. रोमन जगात, अधिकारपदानुक्रम सर्वकाही होते. अधिकाररचनेने सर्वकाही सांभाळले जात असेे आणि प्रत्येकाला त्यांचे योग्य स्थान दिले जाई. या पदानुक्रमाचा भाग असलेल्या शताधिपतीला उच्च पदांधिकार्याजवळ असलेल्या अधिकाराचे परिणाम समजले. म्हणूनच त्याने येशूला त्याच्या घरी येण्यासाठी स्वतःला थकवू न देण्याचे आणि फक्त शब्द बोलण्याचे आणि त्याच्या सेवकाला दूरून बरे करण्याचे स्वातंत्र्य दिले. त्याला हे समजले होते की दैवी क्षमता असलेल्या या रब्बीसोबत धार्मिक कार्यक्रम तयार करण्याऐवजी तो त्याच्या सेवकाच्या दिशेने त्याची अद्भुत कार्य शक्ती सोडण्याची प्रत्यक्ष विनंती करू शकतो.
कित्येकदा, आपण जे येशूला वैयक्तिकरित्या ओळखतो ते त्याच्याशी भेटताना धार्मिकतेचे आणि कर्मकांडाचे पालन करतो, जेव्हा प्रत्यक्षात तो आपल्या कल्पनेपेक्षा जवळचा आणि आपल्याला माहित असलेल्यापेक्षा जास्त वास्तविक असतो! तो आपल्याला केवळ औपचारिक, सामुहिक मेळाव्यांमध्येच नव्हे तर आपल्या जीवनातील सामान्य गोष्टींमध्ये देखील भेट देतो. अनेकदा आपण त्याला भेटण्यासाठी छानसा एक परिपूर्ण, सोशल मीडियाचा फोटो तयार करण्याचा प्रयत्न करतो, आपण त्याला आपल्या सामान्य दिवसाच्या प्रत्येक क्षणात आमंत्रित करू शकतो यासाठी की आपल्याला त्याच्या उपस्थितीत राहता यावे. त्या शताधिपतीने त्याच्या चाकराद्वारे येशूच्या चमत्कारिक सामर्थ्याबद्दल ऐकले असावे आणि त्याला इतका विश्वास असावा की तो त्याच्या सेवकाला बरे करू शकेल. तो म्हणतो की येशूला त्याच्या घरी बोलवावे यास तो पात्र नाही, यावरून आपल्याला दिसून येते की येशू खरोखर कोण होता हे त्याला समजले होते आणि त्याच्या गौरवाच्या आणि श्रेष्ठतेच्या तुलनेत, त्याची पदवी किंवा प्रशंसा फारशी महत्त्वाची नव्हती. येशू त्याच्या विश्वासाची वाखाणणी करतो आणि त्याच्या सेवकाला तो जेथे आहे तेथूनच बरे करतो! हे अद्भुत नाही का - एका परराष्ट्रीय व्यक्तीच्या विश्वासाने येशूचे लक्ष वेधले आणि त्याला त्याच्या वतीने कार्य करण्यास प्रवृत्त केले. हे तुम्हाला त्याच्या वचनाद्वारे आणि लोकांच्या जीवनात त्याच्या कार्याद्वारे येशूला अधिक जाणून घेण्यास प्रवृत्त करते का? जेव्हा तुम्ही त्याला जाणता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात अशक्य गोष्ट करण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवल्यावाचून राहू शकत नाही.
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in