चमत्कारांचे ३० दिवसनमुना

विधवेच्या मुलास जिवंत करणे
कळवळा - येशूच्या पृथ्वीवरील सेवाकाळाचे हेच वैशिष्ट्य होते. त्याच्या तीन वर्षांच्या सेवाकाळात त्याने गर्दी पाहिली आणि त्यांच्याबद्दल करुणा वाटली. तो थकलेला असेल, त्याला विश्रांतीची गरज असेल, तरीसुद्धा त्याच्याकडे आजारी किंवा गांजलेल्या लोकांना आरोग्य आणि सुटका मिळवून देण्यासाठी घेऊन येणाऱ्यांना त्याने कधीही नाकारले नाही.
या प्रसंगी त्याने एक अंत्ययात्रा पाहिली आणि आपल्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने तिला थांबवले. तो तरुणच तिच्या आईचा एकमेव आधार होता. तिचे अश्रू पाहून येशूचे अंतःकरण द्रवले. त्याने तिरडीस हात लावला आणि त्या मुलाला पुन्हा जीवनात आणले. येशूला त्या मुलाचे आणि त्याच्या आईचे जीवन पूर्णपणे माहित होते कारण त्यांच्या कहाणीचा लेखक तोच होता. तिच्या एकुलत्या मुलाच्या मृत्यूमुळे तिला किती उद्विग्नता वाटली असती हे त्याला माहीत होते. त्याने त्यांच्या परिस्थितीचा विचार करून योग्य ते पाऊल उचलले.
जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाकडे मागे वळून पाहता, जर तुम्ही त्याचे बारकाईने परीक्षण केले तर तुम्हाला देवाच्या करुणेचा धागा सापडेल जो प्रत्येक घटकाला सुसंगतपणे धरून ठेवतो! त्याची खोल आणि कमी न होणारी आपल्याला पृथ्वीवरील आपल्या संपूर्ण जीवनात पुढे नेते. आपले रस्त्यावरचे कौशल्य, आपली बुद्धिमत्ता, आपले संबंध किंवा आपला चांगुलपणा आपल्याला धरून ठेवत नाही तर त्याचे दयाळू आणि शाश्वत प्रेम आहे. तो तुमच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान गोष्टी जाणतो आणि करुणेने तो तुम्हाला हळूवारपणे त्या सर्व गोष्टींमधून पुढे नेतो.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, विशेषतः जेव्हा आपल्यावर संकटे येतात आणि आपल्याला धक्का बसतो, कारण ते आपल्याला अढळ सत्यावर आधारित करते की कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या प्रीतीपासून वेगळे करू शकत नाही. तुमच्या आरोग्य समस्या, तुमचे तुटलेले हृदय, तुमचा घायाळ झालेला अहंभाव, तुमचा रिकामा बँक बॅलन्स किंवा तुमची कमी झालेलंे बळ देवाचे प्रेम तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
देवाच्या आतापर्यंतच्या परिस्थितीबद्दल आणि करुणेबद्दल आज तुम्ही त्याचे आभार मानण्यासाठी एक क्षण काढाल का? ते कधीही संपत नाही - ते तुमच्या जीवनातील सर्व दिवस तुमच्या मागे राहील.
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in