चमत्कारांचे ३० दिवसनमुना

येशू वादळ शांत करतो
वादळे सर्वांच्या जीवनात येतात. कोणीही यातून सुटलेले नाही. हा आपल्या मानवी अनुभवाचा एक भाग आहे. आरोग्यात अचानक येणारे अडथळे, नातेसंबंध तुटणे आणि करिअरमधील बदल ही काही वादळे आहेत जी आपल्यावर आघात करू शकतात. या वादळांमध्ये, प्रार्थना करणे, त्यातून चांगले असे काहीतरी उद्भवतांना पाहणे आणि शांती मिळवणे कठीण असते. तरीही वादळांमुळे देवावरील आपले विसंबून राहणे आणखी वाढवता येते.
७शिष्यांकडे पाहा - अचानक आलेल्या वादळाने त्यांच्या लहानशा होडीस धडक मारली आणि ती जवळजवळ उलटली असती. घाबरलेले शिष्य येशूला उठवतात आणि असा प्रश्न करतात जो आपणही आपल्या आयुष्याच्या वादळात अडकताना विचारतोरू
“तुला काही फरक पडत नाही का? आपण बुडणार आहोत!”
येशूने उत्तर शब्दांत दिले नाही, तर कृतीतून दिले. तो उठला आणि वाऱ्याला व लाटांना धमकावले - फक्त तीन शब्दांत: “उगा राहा, शांत हो.” गर्जणारे वारे आणि उसळणाऱ्या लाटा लगेच शांत झाल्या. या क्षणाचे सौंदर्य यामध्ये होते की निसर्गाने आपल्या सृष्टीकर्त्याला त्वरित प्रतिसाद दिला. ईयोबाचे पुस्तक आम्हाला समजावते की आपला देव निसर्गावर किती सामर्थ्यवान आणि सार्वभौम आहे. त्याच्या नियंत्रणाबाहेर काहीही नाही; त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर तो अधिकार गाजवतो. हे आश्चर्यकारक नाही का, की निसर्ग देवाच्या इच्छेनुसार वागतो, पण आपण- ज्यांना स्वतंत्र इच्छेची देणगी लाभली आहे - अनेकदा तसे करत नाही? आपण पाहिले की भूतकाळात देवाने अनेकदा अनेकप्रकारे मदत केली, तरीसुद्धा जेव्हा नवे वादळ येते, तेव्हा आपण पूर्णपणे भांबावून जातो. तेव्हा येशू कदाचित आपल्याला हळूच सांगतो: “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हांला विश्वास कसा नाही?”
तुम्ही तुमच्या तारणाऱ्यावर किती अवलंबून आहात? त्यावेळी येशू, जो नावेत झोपला होता, त्याच्या विपरीत, पुनरूत्थित आणि स्वर्गारोहित येशू झोपत नाही किंवा डुलकी ही घेत नाही (स्तोत्र १२१); त्याऐवजी, तो रात्रंदिवस सतत आपले लक्ष ठेवतो. तुम्ही ज्या वादळातून जात आहात आणि भविष्यातही जात राहाल त्या प्रत्येक वादळाकडे त्याचे लक्ष असते. तो तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणेल असा विश्वास असल्यास तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in