YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चमत्कारांचे ३० दिवसनमुना

चमत्कारांचे ३० दिवस

30 पैकी 10 दिवस

वाळलेल्या हाताच्या माणसाला बरे करणे

वाळलेला हा शब्द निराशाजनक परिस्थिती दर्शवितो. तो एक वाळलेला अवयव होता जो वापरता येत नव्हता. तो कदाचित बराच काळ मुख्य रूपाने वापरला गेला नव्हता आणि त्यामुळे त्याला त्या हाताशिवाय जगण्याची सवय झाली होती. येशूने त्याची स्थिती लक्षात घेतली आणि त्याच्यावर आरोप लावणार्यांच्या समोर त्याला सार्वजनिकरित्या बरे करण्याचा निर्णय घेतला. त्या माणसाला दिलेली त्याची आज्ञा त्याच्या अशक्यतेमुळे जवळजवळ एक विरोधाभासासारखी वाटते. सुकलेल्या आणि निर्जीव वस्तू कशा पसरवता येतात? तुमच्या जीवनातील काही पैलू पूर्णपणे सुकलेले आणि पुनर्स्थापित करण्यास असमर्थ असल्याचा तुम्ही किती वेळा विचार केला आहे? सौंदर्य त्या माणसाच्या विश्वासाच्या प्रदर्शनात आहे, की तो कसा आज्ञा पाळून हात पुढे करतो. त्याला अर्धवट नाही तर पूर्ण आरोग्य मिळाले.

तुम्ही किती वेळा आपल्या आयुष्याच्या काही गोष्टींविषयी असा विचार केला आहे का, की त्या पूर्णपणे वाळून गेल्या आहेत आणि पुन्हा कधीही सुधारणार नाहीत? कदाचित ती एखादी नाती असतील, करिअरची दिशा, आरोग्याची अडचण किंवा मनातील गोंधळ असू शकतो. जर येशू तुम्हाला विश्वासाने त्या मृत झालेल्या भागाला त्याच्या पुढे आणायला सांगेल, तर तुम्ही ते कराल का?

संदेष्टा यहेज्केलला असा एक दृष्टांत झाला की एका दरीत कोरडी हाडे पडलेली आहेत. पण देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये श्वास घालतो आणि ती जिवंत होऊन एक बलशाली सैन्य बनतात. हे बंदिवासात असलेल्या यहूद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लिहिले गेले होते, पण ते वचन त्यांच्यासाठीही आहे ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, कारण येशूवरील विश्वासाने आपले तारण झाले आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक भाग जो पूर्वी वांझ आणि निष्फळ होता, तो पवित्र आत्म्याच्या श्वासाने नव्याने ताजा आणि जीवनदायी होऊ शकतो.

ते नवीन वाटेल, कदाचित अस्वस्थ किंवा अगदी वेदनादायीही वाटेल, पण जो तुमची भेट घेतो तोच पुनरुत्थानाच्या जीवनाचा स्रोत आहे. आपण विश्वासाने त्याच्या हाती दिलेल्या अगदी शुष्क आणि मृत गोष्टींनाही तो पुन्हा जिवंत करू शकतो. तुम्ही आज ते विश्वासाचा पाऊल उचलणार का?

या योजनेविषयी

चमत्कारांचे ३० दिवस

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in