चमत्कारांचे ३० दिवसनमुना

कुष्ठरोगी माणसाचे बरे होणे
हे चित्र आपल्या मनात रंगवा: जोपर्यंत तुम्हाला आठवत असेल तुम्ही सामाजिकदृष्ट्या परके, बहिष्कृत म्हणून जगला आहात. तुम्ही कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत राहता इतर अनेक लोकांसोबत ज्यांना त्यांच्या आजारामुळे बहिष्कृत करण्यात आले आहे. एक व्यक्ती म्हणून तुमची ओळख गमावली आहे आणि इतरांनी तुमच्या जवळ येऊ नये म्हणून तुम्हाला झाकून राहावे लागते आणि “अशुद्ध, अशुद्ध” असे ओरडावे लागते.
येशूला भेटलेल्या आणि त्यास त्याला शुद्ध करावयाची इच्छा आहे का असे विचारणाऱ्या माणसाची ही दुर्दशा होती. येशूने फक्त असे म्हटले नाही की त्याची इच्छा आहे, तर त्याला स्पर्श करून त्यांच्यातील अंतर दूर केले. दोन शब्दांत सांगायचे तर “शुद्ध हो”,येशूने त्याला बरे केले आणि साक्ष देण्यासाठी आभार म्हणून भेट देण्यासाठी याजकाकडे पाठवले. केवळ येशूच असा चमत्कार करू शकतो जो एका मिनिटात एखाद्याची ओळख आणि सामाजिक प्रतिष्ठा बदलून टाकतो आणि जे पुनर्स्थापन तो घडवून आणतो त्याच्यासाठी आपल्याकडून फक्त एक गोष्टीची गरज आहे - पाहणाऱ्या जगासमोर साक्ष देणे.
कदाचित तुमच्या परिस्थितीमुळे किंवा आजारामुळे तुम्हाला बहिष्कृत असल्यासारखे वाटले असेल. जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तेव्हा तो तुम्हाला स्वतःचे म्हणतो. तुमची ओळख बाहेरून आतल्या व्यक्तीमध्ये बदलते. त्याहूनही चांगले, तुम्ही आता देवाचे मूल आहात. तुमच्या पित्यास तुमचा अभिमान आहे आणि तो तुम्हाला त्याचा पुत्र येशूच्या राज्यात घेऊन जातो, जेथे तुम्ही राज्याद्वारे प्राप्त सर्व गोष्टींचे वारस होता. किती मोठा बदल! कारण तुम्ही येशूला हे विचारण्याची संधी घेतली की तो तुम्हाला पापापासून शुद्ध करण्यास तयार आहे का. तुमचे तारण झाल्यावर सर्व काही बदलले. आता तुम्ही जाऊ शकता आणि सर्व जगासाठी साक्ष ठरू शकता.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in