चमत्कारांचे ३० दिवसनमुना

पहिले चमत्कारिकरित्या मासे पकडणे
शिमोन पेत्रासारखा अनुभवी मासेकरू येशू, जो व्यवसायाने सुतार आहे, त्याच्याकडून त्याच्या मासे धरण्याचे प्रशिक्षण घेतले जाईल अशी तुम्ही कल्पना करू शकता का? त्याच्या बचावात, येशू जगाचा उत्पन्नकर्ता आणि पालनकर्ता होता आणि अजूनही आहे. ज्याने जग अस्तित्वात आणले त्याच्यासाठी, पेत्राच्या नावेजवळ माशांच्या टोळीला येण्याचे आणि त्याच्या जाळ्यात जाण्याचे आदेश देणे हे इतके सोपे झाले असते. जर तुम्हाला असे वाटत असेल की देवासाठी काहीही कठीण नाही आणि त्याच्यासोबत काहीही शक्य आहे, तर तुम्ही अशा विस्मयकारक चमत्कारासाठी स्वतःला तयार करता. तुम्ही तुमचे बळ आणि कौशल्याच्या जागेतून काम करत असाल, परंतु देवाच्या स्पर्शासाठी त्यात जागा आहे का?
तुम्ही जे शिकलात ते येशू तुमच्यापेक्षा चांगले करू शकतो. तुम्ही जे प्रशिक्षण घेतले आहे ते येशू तुमच्यापेक्षा अधिक उत्तम प्रकारे करू शकतो. यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळते की तुम्हाला निरुपयोगी वाटते? देवाने तुमच्यावर सोपवलेल्या गोष्टी पूर्ण करण्यास तो अमर्यादपणे अधिक सामर्थ्यवान आहे हे जाणून तुम्हाला आशीर्वाद लाभेल अशी मला आशा आहे. आपण याला कसा प्रतिसाद द्यावा? एक तर, आपण देवाला आपल्या कामात प्रभावीपणे आमंत्रित करू शकतो आणि त्याला मार्ग दाखवण्याची मोकळीक देऊ शकतो. आपण आपल्या व्यवसायात त्याचा सल्ला घेऊ शकतो आणि त्याला आपला वरिष्ठ भागीदार म्हणून सहभागी करू शकतो. आपण आपल्या अभ्यासात त्याच्याशी जुळवून घेऊ शकतो कारण तो बुद्धी आणि ज्ञानाचे मूर्त रूप आहे. देवाला तुमच्या कामात आणत असता अलौकिक गोष्टी कशा प्रगट होतात ते पहा आणि तो तुमच्यावर चमत्कारिक आशीर्वाद आणि कृपा कशी आणतो ते पहा.
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in