चमत्कारांचे ३० दिवसनमुना

संध्याकाळी येशू अनेक आजारी लोकांस आणि पीडितांस बरे करतो
तो आपल्याला भेटण्यासाठी आत्मिकदृष्ट्या काही उच्च पातळी गाठण्याची वाट पाहत नाही, तर त्याऐवजी एम्माऊसच्या मार्गावरील त्या दोन माणसांप्रमाणे, तो दररोज प्रवास करताना तुम्हाला भेटतो. जेव्हा आपल्याला त्याचे वचन किंवा त्याचे मार्ग समजण्यास अडचण येत असेल तेव्हा तो आपल्याला मदत पाठवू शकतो जसे त्याने कुशी राजवाड्याच्या अधिकाऱ्यासाठी केले होते, ज्याला फिलिप रस्त्याच्या कडेला त्याच्या रथात भेटला आणि त्याला सुवार्ता सांगितली.
अंधार आणि प्रकाश हे सर्केडियन लयीवर ताण, तापमान, पोषण आणि इतर घटकांसह दोन प्राथमिक प्रभाव पाडतात. मुद्दा असा आहे की प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण देवाच्या हाती आहे. सूर्यास्तानंतर, अनेकांना थकवा, एकाकीपणा, वारंवार होणारे आजार आणि आध्यात्मिक दडपन यामुळे नैराश्य, अनुत्पादकता, हताशा या भावनांशी संघर्ष करावा लागतो. जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी, म्हणजे, त्यांना सेवानिवृत्ती, वृद्धत्वाचे शरीर आणि मंदबुद्धी यामुळे उद्देश्यपूर्ण जीवन जगणे कठीण वाटते. अनेकांना रात्रीच्या भीतीमुळे, झोप न येण्यामुळे किंवा कामाच्या ठिकाणी रात्रीच्या उशिरा शिफ्टमुळे रात्री झोपणे कठीण वाटते. हा परिच्छेद त्या प्रत्येकासाठी आहे जे स्वतःला त्यांच्या “सांयकाळशी” झुंजताना पाहतात. हे एक आठवण करून देते की येशू दिवसा आणि रात्री तुमच्याजवळ आहे. तुम्ही वृद्ध होताना तो तुम्हाला एकटे सोडत नाही, तो तुम्हाला आश्वासन देतो की तो तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात वाहून नेईल. ज्यांना संध्याकाळी आध्यात्मिक, शारीरिक किंवा मानसिक जडपणाला तोंड द्यावे लागते त्यांनी खात्री बाळगावी की तुमचा तारणारा तुमच्यासोबत बसतो आणि तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये सांभाळून नेतो.
येशू फक्त आजारी किंवा पीडितांना भेटला नाही; त्याने त्यांना एका शब्दाने आणि स्पर्शाने बरे केले! तो तुमच्यासाठीही असेच करू शकतो. देव तुमची सतत काळजी घेतो आणि तुम्ही कधीही त्याच्या काळजीबाहेर नसता हे जाणून तुम्हाला आता संध्याकाळची भीती बाळगण्याची गरज नाही.
ज्या दिवशी पेत्राची सासू बरी झाली त्याच दिवशी येशूने इतर अनेकांना बरे केले. पवित्र शास्त्रात सायंकाळी होणाऱ्या या बरे होण्याच्या घटनांची नोंद आहे. हे कदाचित क्षुल्लक वाटेल, परंतु ते बारकाईने अभ्यासण्यासारखे आहे. संपूर्ण निसर्गात २४ तासांत घडणाऱ्या विविध प्रणाली व प्रक्रिया असतात. एका दिवसात होणाऱ्या काही शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित बदलांना एकत्रितपणे सर्केडियन लय म्हणतात. या सर्केडियन लय नियंत्रित करणाऱ्या प्रणालीला सामान्य शब्दात जैविक घड्याळ म्हणतात.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in