चमत्कारांचे ३० दिवसनमुना

पेत्राची सासू बरी झाली
पूर्वी एक विनोद प्रचलित होता ज्यात असा दावा केला जात असे की येशूने त्याच्या सासूला बरे केले म्हणून पेत्राने येशूला नाकारले. विनोद पुरे झाला, हा एक अतिशय सामान्य, रोजचा चमत्कार आहे ज्याकडे आपण डोळेझाक करू शकतो किंवा त्याला कमी महत्वपूर्ण समजू शकतो. या लहानश्या घटनेचे सौंदर्य म्हणजे येशू आपल्या सामान्य जीवनात आपल्याला कसा भेटतो यात आहे. तो पेत्राच्या घरी गेला आणि त्याची सासू आजारी असल्याचे पाहून तो तिला स्पर्श करतो आणि तिला बरे करतो.
हा एक जुना विनोद होता जो प्रचलित होता, लोक म्हणायचे की येशूने पेत्राच्या सासूला बरे केले होते म्हणून त्याने येशूचा अव्हेर केला विनोद बाजूला ठेवला तर, ही एक अगदी साधी, रोजच्या आयुष्यात घडणारी अशी चमत्कृती आहे जी आपण सहज दुर्लक्ष करू शकतो किंवा कमी लेखू शकतो.
या छोट्या प्रसंगाची सुंदरता यात आहे की येशू आपल्या साध्या, नेहमीच्या आयुष्यात आपल्याला भेटतो. तो पेत्राच्या घरी आला आणि त्याच्या सासूबाई आजारी असल्याचे पाहून, त्याने त्यांना स्पर्श केला आणि बरे केले.
तुमच्या रोजच्या जीवनात येशू तुम्हाला कसा भेटेल? तुम्ही त्याला तुमचे काम, तुमचे शरीर, तुमचे मन, तुमचे जवळचे नातेसंबंध, तुमची स्वप्ने आणि इच्छांना स्पर्श करण्यासाठी आमंत्रित केले आहे का? आपण जेथे आहोत तेथेच येशू आपल्याला भेटतो.
हा आपला परमेश्वर देव आहे जो आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला कोणत्याही दिखाव्यावाचून आणि वैभवावाचून भेटतो, साधारण गोष्टी सुंदर बनवतो. चमत्काराची वाट पाहण्याची आणि जगिक गोष्टी देवाला जाण्याची चूक करू नका. जेव्हा ख्रिस्त त्यात प्रवेश करतो आणि आपल्या हातांनी त्याला स्पर्श करतो तेव्हा जे जगिक ते गौरवी ठरते.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in