चमत्कारांचे ३० दिवसनमुना

भूतग्रस्त माणसाची सुटका
येशूने जे शिकवले त्यानुसार तो चालला. याचा निश्चित अर्थ काय? नियमशास्त्राच्या शिक्षकांविपरीत तो अधिकारवाणीने सभास्थानात शिकवत असे. नंतर त्याने एका माणसातून दुरात्म्याला बाहेर जाण्याची आज्ञा देऊन ते आचरणात आणले. येशूचा अजेंडा नेमका काय आहे हे दुरात्म्याला कसे कळले आणि तो कसा बाहेर काढला गेला हे विस्मयकारक आहे. तुम्हाला ते समजले का? त्याने येशूला विचारले की तो त्यांचा नाश करण्यासाठी आला आहे का. येशूच्या सेवाकार्याच्या पाचारणाचा एक मोठा भाग होता सैतानाची कामे नष्ट करणे. येशू त्याच्या जीवनाचा हेतू पूर्णपणे जगला. त्याने अधिकारवाणीने शिकवले आणि नंतर लोकांना सुटका देण्यासाठी त्या अधिकाराचा वापर केला.
जर तुम्हाला कधी भावनिक, मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे असमर्थ आणि अक्षम वाटले असेल, तर तुम्हाला माहित असेल की तुम्हाला बांधून ठेवणाऱ्या अदृश्य साखळदंडांपासून मुक्त होणे किती मोलाचे आहे. आपला तारणारा येशू, आपल्याला बांधून ठेवणाऱ्या आणि भग्न अशा प्रत्येक गोष्टीपासून मुक्त करण्याचे सामर्थ्य आहे.देवाचा पुत्र असल्याने, त्याला अंधाराच्या प्रत्येक शक्तीवर सर्व अधिकार होता आणि आजही तो सैतानावर विजयी आहे. त्याने हे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवले नाही तर ते आपल्यापैकी प्रत्येकाला प्रतिनिधी म्हणून दिले ज्यांनी ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारले आहे. देवाची मुले आणि ख्रिस्ताचे सह-वारस म्हणून, आपल्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर साप आणि विंचू आणि नरकाच्या सर्व शक्तींस तुडवण्याचा सर्व अधिकार आहे. हे अदभुत नाही का? तरीही आपण अनेकदा स्वतःला असहाय्य आणि दुर्बळ समजतो कारण आम्हाला येशूने आपल्या जीवनात त्याला स्वीकारताना आपल्याला दिलेल्या अधिकारांचा विसर पडतो. हा अधिकार आपल्याला पापाच्या बंधनाच्या अदृश्य पण वास्तविक पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्याच्या शत्रूच्या प्रयत्नांवर विजयी होऊन जगण्याचे सामर्थ्य देतोे.
येशूने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही पालन करता का? देवाने तुम्हाला त्याचे मूल म्हणून दिलेल्या अधिकारानुसार तुम्ही जगता का? तुम्ही शत्रूने मर्यादित आणि भग्न जीवन जगत आहात का? देवाने दिलेल्या अधिकारात उभे राहण्याची आणि तुमच्यातील देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने शत्रूला तुडवण्याची वेळ आली आहे.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशू पृथ्वीवर असताना त्याने लोकांसाठी काही अविश्वसनीय अशा गोष्टी केल्या. ही पवित्र शास्त्र योजना वाचताना, आम्हाला आशा आहे की तुम्हाला स्वतःसाठी येशूचा त्याच्या संपूर्ण पपिूर्णतेत अनुभव घडून येईल. पृथ्वीवरील या जीवनात अलौकिकतेसाठी देवावर विश्वास ठेवण्याचे आपण सोडता कामा नये.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/wearezion.in