रोम 10

10
इस्त्राएलबद्दल पौलनी मनिषा
1भाऊ अनी बहिणीसवन, त्यासनं तारण व्हवाले पाहिजे, हाई मना मननी कळकळीनी ईच्छा अनं मनी त्यासनाकरता देवजवळ ईनंती शे. 2कारण त्यासनाबद्दल मी साक्ष देस की, त्यासले देवबद्दल आस्था शे, पण ज्ञानमुये नही. 3कारण त्या देवना न्यायीपणबद्दल अज्ञानी राहतस, अनी स्वतःना न्यायीपण प्रस्थापित कराले दखतस त्या न्यायीपणले वश व्हयना नहीत. 4कारण ख्रिस्त हाऊ ईश्वास ठेवणारा प्रत्येकले न्यायीपणकरता नियमशास्त्रना शेवट शे.
सर्वासकरता तारण
5कारण नियमशास्त्रघाई प्राप्त व्हणारा न्यायीपणबद्दल मोशे लिखस की, “जो मनुष्य त्या आचरण करस तो त्यानाद्वारे जगी.” 6पण ईश्वासघाई मिळणारं न्यायीपण अस म्हणस की, तु आपला मनमा म्हणु नको की, ख्रिस्तले खाल आणाकरता स्वर्गमा कोण चढी. 7किंवा अथांग डोहमा कोण उतरी? म्हणजे ख्रिस्तले मरेलस मातीन वर आणाकरता. 8पण शास्त्र काय म्हणस? ते वचन तुनाजोडे शे, तुना तोंडमा अनं तुना अंतःकरणमा शे. म्हणजे, आम्हीन ज्यासनी घोषणा करतस ते ईश्वासनं वचन हाई शे. 9कारण, येशु प्रभु शे, अस जर तू आपला तोंडतीन कबुल करशी अनी, देवनी त्याले मरेलस मातीन ऊठाडं असा आपला अंतःकरणमा ईश्वास ठेवशी तर तुनं तारण व्हई. 10कारण जो अंतःकरणतीन ईश्वास ठेवस तो न्यायी ठरस अनं जो तोंडतीन कबुल करस त्यानं तारण व्हस. 11म्हणीन शास्त्र सांगस, “त्यानावर ईश्वास ठेवणारा कोणी बी लज्जित व्हवाव नही.” 12यहूदी अनं गैरयहूदी यासनामा फरक नही, कारण सर्वासना प्रभु तोच अनी ज्या त्याना धावा करतस त्या सर्वासले पुरावाकरता तो संपन्न शे. 13कारण शास्त्र सांगस की, “जो कोणी प्रभुनं नाव लिसन त्याना धावा करी त्यानं तारण व्हई.” 14तर ज्यानावर त्यासनी ईश्वास ठेवा नही त्याना धावा त्या कशा करतीन? अनी ज्यानाबद्दल त्यासनी ऐकं नही त्यानावर त्या ईश्वास कसा ठेवतीन? अनी घोषणा करनारासशिवाय त्या कशा ऐकतीन. 15अनी त्यासले धाडाशिवाय त्या कशी घोषणा करतीन? कारण अस लिखेल शे की, #यशया ५२:७“ज्या चांगल्या गोष्टीसनी सुवार्ता सांगतस, त्यासना पाय कितला सुंदर शेतस!” 16#यशया ५३:१पण सर्वासनी सुवार्तानं आज्ञापालन करं नही, कारण यशया म्हणस की, “प्रभु, आमनाकडतीन ऐकं त्यानावर कोणी ईश्वास ठेयल शे?” 17तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस. 18पण मी म्हणस की, त्यासनी ऐकं नव्हतं का? हो, खरच ऐकं व्हतं. त्याना नाद पुरा पृथ्वीवर, अनं त्याना शब्द जगना टोकपावत पोहचनात. 19पण मी सांगस की, इस्त्राएलले कळनं नव्हतं का? पहिले मोशे म्हणस, “ज्या राष्ट्र नहीत त्यासनाकडतीन मी तुमले जळाडसु, एक निर्बुध्द राष्ट्रकडतीन मी तुमले राग आणसु; 20#यशया ६५:१पण यशया संदेष्टा धीट व्हईसन सांगस, ज्यासनी मना शोध करा नही त्यासले मी सापडेल शे; ज्यासनी मनाबद्दल ईचारपुस करा नही त्यासले मी प्रगट व्हयेल शे. 21पण इस्त्राएलबद्दल तो असं सांगस, ‘मी आज्ञा मोडणारा अनं उलटीसन बोलनारा लोकसनापुढे दिनभर आपला हात पसारीसन राहिनु.”

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

रोम 10: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល