लूक 3
3
बाप्तिस्मा करनारा योहान अनं त्याना संदेश
(मत्तय ३:१-१२; मार्क १:१-८; योहान १:१९-२८)
1मंग तिबिर्य गावना कैसर याना राज्यना पंधरावा वरीसले पंतय पिलात हाऊ यहूदीया प्रांतना अधिकारी व्हता; हेरोद गालीलना राजा व्हता; त्याना भाऊ फिलीप्प हाऊ इतुरीया अनी त्राखोनीती या देशसना राजा; अनी लुसनिय हाऊ अबिलेने देशना राजा व्हता, 2हन्ना अनं कैफा या मुख्य याजक व्हतात, तवय जखऱ्याना पोऱ्या योहान याले जंगलमा देवनं वचन प्राप्त व्हयनं. 3मंग बाप्तिस्मा करनारा योहान यार्देन नदीना चारीमेरना सगळा प्रदेशमा “तुमना पापसपाईन फिरा अनी बाप्तिस्मा करी ल्या, अनी देव तुमना पापसनी क्षमा करी” असा उपदेश करत फिरना.
4जसं यशया संदेष्टानी सांगेल शे;
“जंगलमा घोषणा करनारानी अशी वाणी व्हयनी की,
‘प्रभुना मार्ग तयार करा; त्यानी वाट नीट करा!
5प्रत्येक दरी भरी,
प्रत्येक डोंगर अनी टेकडी सपाट व्हई,
वाकड्या वाटा सरळ व्हतीन,
टेकडिवाल्या वाटा सरळ व्हतीन.
6तवय सर्व मनुष्य प्राणी देवनी करेल तारण दखतीन!’”
7 #
मत्तय १२:३४; २३:३३ तवय लोकसनी गर्दी योहान कडतीन बाप्तिस्मा लेवाले त्यानाकडे वनी तवय तो त्यासले बोलना, “अरे सापसना पिल्लासवन!” देवना येनारा क्रोधपाईन पळाकरता तुमले कोणी सुचाडं? 8#योहान ८:३३आत्ते पहिले पापसपाईन फिरा शोभी असा सत्कर्म करा अनं अब्राहाम आमना बाप शे अस आपला मनमा म्हणु नका. मी तुमले सांगस की, देव अब्राहाम करता दगडसपाईन संतती उत्पन्न कराले समर्थ शे! 9#मत्तय ७:१९आत्तेच झाडना मुळजोडे कुऱ्हाड ठेयेल शे; जे जे झाड चांगलं फळ देस नही ते ते झाड तोडीसन अग्नीमा टाकामा येस.
10तवय लोकसनी गर्दीनी त्याले ईचारं, “तर आम्हीन काय कराले पाहिजे?”
11त्यानी त्यासले उत्तर दिधं, “ज्यानाजोडे दोन सदरा शेतस त्यानी ज्याले नही शे त्याले एक देवानं, अनी ज्यानाजोडे अन्न शे त्यानी बी तसच करानं.”
12 #
लूक ७:२९
मंग जकातदार बी बाप्तिस्मा लेवाले वनात अनी त्याले बोलनात, “गुरजी, आम्हीन काय करानं?”
13त्यानी त्यासले सांगं, “तुमले जे नेमी देयल शे, त्यानापेक्षा जास्त जुलुम करीसन लेवु नका.”
14शिपाईसनी त्याले ईचारं, “आमनाबद्दल काय? आम्हीन काय करानं?”
त्यानी त्यासले सांगं, “कोणबद्दल खोटी साक्ष देऊ नका, कोणाकडतीन काहीच जबरदस्ती लेवु नका; आपला पगारमाच खूश राहा.”
15तवय लोक आशा लाईन दखी राहींतात अनी हाऊ ख्रिस्त तर नही ना असा आपला मनमा योहानबद्दल सर्वाजन ईचार करी राहींतात, 16योहाननी त्या सर्वासले उत्तर दिधं, “मी तुमना बाप्तिस्मा पाणीघाई करस हाई खरं, पण जो मनापेक्षा समर्थ शे, ज्याना पायना जोडानी दोरी सोडानी मनी लायकी नही. तो ई राहीना; तो तुमना बाप्तिस्मा पवित्र आत्माघाई अनं अग्नीघाई करी. 17आपलं खळं पुर्ण स्वच्छ कराकरता अनं आपला कोठारमा गहु गोया कराकरता त्याना हातमा त्यानं सुपडं शे; पण भुस्सा राही त्याले नही वलावनारी अग्नीमा जाळी टाकी.”
18आखो त्यानी दुसऱ्याबी बऱ्याच बोधन्या गोष्टी सांगीन लोकसले सुवार्ताना प्रचार करा. 19#मत्तय १४:३,४; मार्क ६:१७,१८राजा हेरोदनी स्वतःना भाऊनी बायको हेरोदीया हिनासंगे लगीन करं अनी त्यानी करेल सर्व कुकर्मंसमुये योहाननी त्याले दोष दिसन फटकारं, 20तवय वरतीन हेरोदनी हाई बी करं की, योहानले कैदखानामा टाकी दिधं.
येशुना बाप्तिस्मा
(मत्तय ३:१३-१७; मार्क १:९-११)
21सर्व लोकसनी बाप्तिस्मा लिधा अनं येशु बी बाप्तिस्मा लिसन प्रार्थना करी राहींता तवय अस व्हयनं की स्वर्ग उघडनं, 22#मत्तय ३:१७; मार्क १:११; लूक ९:३५अनी पवित्र आत्मा कबुतरना मायक त्यानावर उतरना, अनी स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, “तु मना प्रिय पोऱ्या शे, तुनाबद्दल मी भलताच खूश शे.”
येशुनी वंशावळी
(मत्तय १:१-१७)
23येशुनी आपला कामनी सुरवात करी तवय तो जवळपास तीस वरीसना व्हता, त्याले लोक योसेफना पोऱ्या अस समजेत. योसेफ एलीना 24तो मत्ताथना, तो लेवीना, तो मल्खीना, तो यन्नयना, तो योसेफना, 25तो मत्तिथ्यना, तो आमोसना, तो नहुमना, तो हेस्लीना, तो नग्गयना, 26तो महथना, तो मत्तिथ्यना, तो शिमयीना, तो योसेखना, तो योदना, 27तो योहान्नाना, तो रेशाना, तो जरूब्बाबेलना, तो शल्तीएलना, तो नेरीना, 28तो मल्खीना, तो अद्दीना, तो कोसामना, तो एल्मदामना, तो एराना, 29तो येशुना, तो अलियेजरना, तो योरीमना, तो मत्ताथना, तो लेवीना, 30तो शिमोनना, तो यहुदाना, तो योसेफना, तो योनामना, तो एल्याकीमना, 31तो मल्याना, तो मिन्नाना, तो मत्तथाना, तो नाथानना, तो दावीदना, 32तो इशायना, तो ओबेदना, तो बवाजना, तो सल्मोनना, तो नहशोनना, 33तो अम्मीनादाबना, तो अद्यीना, तो अर्णयना, तो हेस्रोनना, तो पेरेसना, तो यहुदाना, 34तो याकोबना, तो इसहाकना, तो अब्राहामना, तो तेरहना, तो नाहोरना, 35तो सरूगना, तो रऊना, तो पेलेगना, तो एबरना, तो शेलहना, 36तो केनानना, तो अर्पक्षदना, तो शेमना, तो नोहाना, तो लामेखना, 37तो मथूशलहना, तो हनोखना, तो यारेदना, तो महललेलना, तो केनानना, 38तो अनोशना, तो शेथना, तो आदामना, तो देवना पोऱ्या.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
लूक 3: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025