लूक 18
18
अन्यायी न्यायाधीश
1त्यासनी नाराज व्हवाले नको अनं कायम प्रार्थनामा ऱ्हावाले पाहिजे, यानाकरता येशुनी त्यासले एक दृष्टांत दिसन शिकाडं. 2एक नगरमा कोणी एक न्यायाधीश व्हता, तो देवले घाबरे नही अनं माणससनी बी पर्वा करे नही; 3अनी त्याच नगरमा एक विधवा व्हती, ती त्यानाकडे कायम ईसन अस सांगे, की, मना न्याय करीसन माले मना विरोधीपाईन सोडाव. 4तरी त्यानी ते बराच काळ पर्यंत करा नही; मंग तो आपला मनमा बोलना, जरी मी देवले घाबरत नही अनं माणससनी पर्वा करस नही, 5पण हाई विधवा माले त्रास देस म्हणीसन मी तिना न्याय करसु, नही तर ती कायम ईसन माले त्रास देत ऱ्हाई. 6तवय प्रभु बोलना, अन्यायी न्यायाधीश काय म्हणस ते ऐका. 7तर ज्या देवना निवडेल लोके शेतस त्या रात्रंदिन रडी रडी मदत करता त्याले हाक मारतस त्यासना तो न्याय करावु नही का? अनी त्यासना न्याय कराले तो येळ लाई का? 8अनी मी तुमले सांगस, तो त्यासना न्याय लवकर करी; तरी पण मनुष्यना पोऱ्या म्हणजे मी ईसु तवय माले पृथ्वीवर ईश्वास सापडी का?
परूशी अनं जकातदार
9आम्हीन धार्मीक शेतस असा ज्या स्वतःबद्दल ईश्वास करीसन अनं दुसरासले तुच्छ मानी ऱ्हाईंतात त्यासले बी येशुनी हाऊ दृष्टांत सांगा; 10एक परूशी अनं एक जकातदार असा दोनजन प्रार्थना कराकरता वर मंदिरमा गयात; 11परूशीने उभं राहिसन आपला मनमा स्वतःबद्दल अशी प्रार्थना करी; हे देवा, इतर माणसं लोभी, अप्रामाणिक, व्यभिचारी असा शेतस, त्यासनामायक किंवा ह्या जकातदारनामायक मी नही, म्हणीन मी तुना उपकार मानस. 12मी आठवडामा दोनदा उपास करस; जे माले मिळस ते सर्वासना दशांश देस. 13पण जकातदार तर दूर उभा ऱ्हाईसन वर स्वर्गकडे बी दखं नही अनी आपली छाती ठोकीन बोलना, हे देवा, मनामायक पापीवर दया कर. 14#मत्तय २३:१२; लूक १४:११मी तुमले सांगस, की, त्या परूशीपेक्षा, जकातदार धार्मीक ठरीसन खाल आपला घर गया; कारण जो कोणी स्वतःले उचा कराले दखस त्याले निचा करामा ई, अनी जो कोणी स्वतःले निचा करस त्याले उचा करामा ई.
येशु धाकला पोऱ्यासले आशिर्वाद देस
(मत्तय १९:१३-१५; मार्क १०:१३-१६)
15येशुनी पोऱ्यासले आशिर्वाद देवाले पाहिजे म्हणीन काही लोके आपला धाकला पोऱ्यासले त्यानाकडे लई वनात, पण हाई दखीसन शिष्य त्यासले दताडु लागनात. 16पण येशुनी पोऱ्यासले आपलाजोडे बलावं अनी सांगं, पोऱ्यासले मनाजोडे येऊ द्या, त्यासले मना करू नका; कारण देवनं राज्य यासना मायकसनंच शे. 17मी तुमले खरंखरं सांगस, जो कोणी धाकला पोऱ्यासना मायक व्हईसन देवना राज्यना स्विकार कराऊ नही, त्याना स्वर्गमा प्रवेश व्हवावुच नही.
श्रीमंत माणुस
(मत्तय १९:१६-३०; मार्क १०:१७-३१)
18एक यहूदी अधिकारीनी येशुले ईचारं, अहो उत्तम गुरजी, काय करावर माले सार्वकालिक जिवन भेटी? 19येशुनी त्याले सांग, माले चांगला का बरं म्हणस? एक म्हणजे देवना शिवाय कोणीच चांगला नही. 20तुले तर देवन्या आज्ञा माहित शेतस; “मनुष्यहत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, कोणी खोटी साक्ष देऊ नको, फसाडु नको, ‘आपला बाप अनी माय यासना मान राख.” 21तो यहूदी अधिकारी बोलना, मी तरूणपणपाईन ह्या सर्व आज्ञा पाळी ऱ्हाईनु शे. 22हाई ऐकीन येशु त्याले बोलना, तुले आखो एक गोष्ट करनी शे; तुनं सगळं ईकीसन गरीबसले वाटी दे म्हणजे तुले स्वर्गमा संपत्ती भेटी; चल मनामांगे ये. 23पण हाई ऐकीसन तो भलताच नाराज व्हईना, कारण तो खुप श्रीमंत व्हता. 24तवय येशु त्यानाकडे दखीसन बोलना, श्रीमंतसना देवना राज्यमा प्रवेश व्हवानं कितलं कठीण शे! 25श्रीमंतनी देवना राज्यमा प्रवेश करानं यानापेक्षा उंटले सुईना नाकमातीन जावानं सोपं शे. 26ज्यासनी हाई ऐकं त्या ईचाराले लागनात, मंग कोणं तारण व्हई? 27येशु बोलना, ज्या गोष्टी मनुष्यले अशक्य शे, त्या देवले शक्य शेतस. 28तवय पेत्र बोलना, आम्हीन, आमना घरदार सोडीसन तुमना मांगे येल शेतस. 29येशु त्यासले बोलना, मी तुमले खरंखरं सांगस, देवना राज्यकरता ज्यानी आपला घरदार, बायको, भाऊ, मायबाप किंवा पोऱ्यासोऱ्या सोडेल शे. 30त्याले ह्या युगमा पुष्कळ पटमा भेटी अनं येणारा युगमा सार्वकालिक जिवन भेटी.
येशुनी तिसरांदाव स्वतःना मृत्युबद्दल करेल भविष्य
(मत्तय २०:१७-१९; मार्क १०:३२-३४)
31तवय येशुनी बारा शिष्यसले बाजुले लई जाईसन सांगं, दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत, अनी मनुष्यना पोऱ्याबद्दल जे संदेष्टासद्वारे लिखामा येल शे त्या सर्व गोष्टी पुर्ण व्हणार शेतस, 32त्या त्याले गैरयहूदीसना स्वाधीन करतीन, त्या त्यानी थट्टा करतीन अनी बेईज्जती करतीन, त्यानावर थुंकतीन, 33त्याले फटका मारतीन, त्याना जीव लेतीन, अनी तिसरा दिन तो परत जिवत व्हई. 34त्यासले ह्या गोष्टीसबद्दल काहीच समजनं नही, कारण हाई वचन त्यासनापाईन गुप्त ठेवामा येल व्हतं अनी येशुनी सांगेल गोष्टी शिष्यसले समजेल नव्हत्यात.
आंधया बार्तीमयले दृष्टीदान
(मत्तय २०:२९-३४; मार्क १०:४६-५२)
35येशु यरीहो जोडे वना तवय अस व्हयनं की, एक आंधया वाटमा भीक मांगत बशेल व्हता; 36त्यानी जोडेतीन जाणारी लोकसनी गर्दीना आवाज ऐकीन ईचारं, हाई काय शे?
37त्यासनी त्याले सांगं, येशु नासरेथकर आठेन जाई राहिना.
38तवय तो वरडीन बोलना, “हे येशु, दावीदना पोऱ्या! मनावर दया कर!”
39मंग त्यानी गप्प ऱ्हावाले पाहिजे म्हणीन पुढे चालनारासनी त्याले दताडं; तरी पण तो आखो जास्तच वरडीन बोलना, हे दावीदना पोऱ्या, मनावर दया कर.
40तवय येशुनी उभं राहिन आज्ञा करी की, त्या आंधया माणुसले मनाकडे लई या, तो जोडे येवावर त्यानी त्याले ईचारं, 41मी तुनाकरता काय करू अशी तुनी ईच्छा शे? तो बोलना, प्रभु, माले परत दृष्टी मिळु दे.
42येशु त्याले बोलना, तुले दृष्टी मिळो, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे.
43त्याच क्षणले त्याले दखावाले लागणं अनं अनी तो देवना गौरव करीसन त्यानामांगे चालाले लागना; तवय सर्व लोकसनी हाई दखीन देवना उपकार मानात.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
लूक 18: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025