लेवीय वळख

वळख
लेवीना पुस्तक कायद कानूनतीन बनेल शे, परमेश्वरनी मोशेले लायीसनं इस्राएल लोकेसेल देयल व्हतं. हाई कायदा कानून बलीदान कसे करानं अनी दर्शनमंडपनाजोडे आराधणा कसे करानं यानाबारामां देयल शे “लेवी” हाई शब्दना आर्थ “लेवीसना बारामा” जो इस्राएलना कुय व्हता ज्यासले परमेश्वरनी याजक म्हनीसनं (पाळक) अनी मंदीरनी देखभाल कराकरतान निवाडेल व्हत. परंपरातीन दखाले गयूत तर ज्या विद्वान व्हतात त्यासले आशे वाटसं की लेवीन पुस्तक अनी दुसरा पुस्तकबी (उत्पती, निर्गम, गणना अनी अनूवाद) भविष्यवक्ता मोशे यानी हाई लिखेश शे, त्यामां आशे प्रचुती व्हसं की पुस्तक सोता आशे संकेत देस, कारन लिखेल शे की परमेश्वरनी हया गोष्टी मोशेले सांगेल व्हत्यात. काही विद्वानसले आशे बी वाटसं की या पुस्तक जुना कायमां एकजागे व्हयीसनं मनजे 5 वी, 6 वी इ.स.पु बाबेलमां तयार व्हयनी. 1:1
लेवीयना पुस्तकमां सुरुवातले आशे वाचामा येस की परमेश्वरनी याजकसले येगयेगळा परकारनां चढावाना आदेश देयल शे. यासमासला काही बलीदान लोकेसना पापसकरता चढायेल व्हतात. काही बलीदान सोतानी ईच्छातीन, बाकीनासनी परमेश्वर प्रेम व्हत म्हनीसनं मानता करात, कोनतबी बलीदान राहो शुध्द अनी बिन दोषना राहावाले पाहीजे, मनजे माणुसकडतीन एकदव उत्तम राहावाले पाहीजे, हाई परीस्थीती परमेश्वरनी पवित्रता दखाडसं. हाई पुस्तकनी शेवटना भागमां आशे समजाडामां येयल शे की इस्राएल अनी याजक हयासनी कशे शुध्द राहावाले पाहीजे, तशेच अशुध्दतामाईन शुध्द कशे व्हवाले पाहीजे हाई सांगेश शे. हाई पुस्तकना परमुख ईषय हाई शे की परमेश्वर पवित्र शे, अनी हाई पुस्कमां देयल बठा नियम पाळीसनं परमेश्वरनीसंगे राहावानं.
रूपरेषा
येगयेगळा बलीदान चढावाना आदेश देयल शेतस. 1:1–7:38
अहरोन अनी त्याना पोऱ्या यासले याजक बनाडानी बारामां सांगेल शेतस. 8:1–10:20
शुध्द अनी अशुध्द मनजे येगयेगळा आजार यानाबारामां नियम सांगेल शेतस. 11:1–15:33
अन्न, सण, माणुसनी वागनूक अनी शब्बाथ यानीबारामां येगयेगळा नियम सांगेल शेतस. 16:1–27:34

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

लेवीय वळख: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល