याकोब 5

5
श्रीमंतसले इशारा
1अहो श्रीमंतसवन, जे कष्ट तुमले व्हवाव शे त्यानाबद्दल आक्रोश करीसन रडा. 2#मत्तय ६:१९तुमनं धन नष्ट व्हयेल शे, अनं तुमना कपडासले कुज लागेल शे. 3तुमनं सोनं अनी तुमनी चांदी यासले जंग चढेल शे, त्याना तो जंग तुमना विरूध्द साक्ष व्हई, अनी तो अग्नीनामायक तुमनं शरीर खाई, शेवटला दिनसकरता तुम्हीन धन गोया करेल शे. 4ज्या कामगारसनी तुमनी शेतीमा कापणी करी त्यासनी तुम्हीन अडकाई ठेयल मजुरी वरडी राहीनी. अनी कापणारासना आरोळ्या सेनाधीश प्रभुना कानवर जायेल शे. 5तुम्हीन पृथ्वीवर चैनबाजी अनी विलास करेल शे, वधना रोज तुम्हीन आपला मननी तृप्ती करेल शे. 6धार्मीकले तुम्हीन दोषी ठराय, त्याना घात करा, तो तुमले आडावस नही.
धीर अनी प्रार्थना
7अहो भाऊ अनी बहिणीसवन, प्रभुना आगमन पावत धीर धरा, दखा, शेतकरी भुमीना मोलवान पीकनी वाट दखतांना त्याले पहिला अनी शेवटला पाऊस भेटापावत त्यानाबद्दल तो धीर धरस. 8तुम्हीन बी धीर धरा, आपला मनंसले स्थिर करा, कारण प्रभुनं आगमन जोडे येल शे.
9भाऊ अनी बहिणीसवन तुम्हीन दोषी ठराले नको म्हणीसन एकमेकसवर चिडीसन कुरकुर करू नका, दखा, न्यायाधीश दारजोडे उभा शे 10भाऊ अनी बहिणीसवन, ज्या संदेष्टा प्रभुना नावतीन बोलनात त्यासनं दुःख सहन अनी धीर यानाबद्दल कित्ता ल्या. 11ज्यासनी सहन कर त्यासले आपण धन्य म्हणतस, तुम्हीन ईयोबना धीरबद्दल ऐकेल शे, अनी प्रभुकडतीन जो त्याना शेवट व्हयना तो दखेल शे यावरतीन प्रभु फार कनवाळू अनी दयाळु शे हाई तुम्हीन दखेल शे. 12#मत्तय ५:३४-३७मना भाऊ अनी बहिणीसवन, मुख्य शप्पथ वाहू नका, स्वर्गनी, पृथ्वीनी किंवा कोणती बी दुसरी शप्पथ वाहू नका, तुम्हीन दोषी ठराले नको म्हणीसन तुमले हो, म्हणनं व्हई तर “हो” म्हणा, “नही” म्हणनं व्हई तर “नही” म्हणा.
ईश्वासनी प्रार्थनानं सामर्थ्य
13तुमनापैकी कोणी दुःख भोगी राहीनात का? त्यासनी प्रार्थना करानी, कोणी आनंदमा शे का? त्यानी स्तोत्र म्हणाले पाहिजे. 14#मार्क ६:१३तुमनापैकी कोणी आजारी शेतस का? त्यासनी मंडळीना वडील लोकसले बलावानं अनी त्यासनी प्रभुना नावतीन त्याले तेल लाईसन त्यावर हात ठिसन प्रार्थना कराले पाहिजे. 15ईश्वासनी प्रार्थना रोगीले वाचाडी. प्रभु त्याले ऊठाडी, अनी त्यानी पाप करेल व्हईत तरी त्याले क्षमा व्हई. 16यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास. 17एलिया आमनामायक स्वभावना व्हता, त्यानी पाऊस पडाले नको अशी आग्रह करीसन प्रार्थना करी, अनी साडेतीन वरीस पृथ्वीवर पाऊस पडना नही. 18परत त्यानी प्रार्थना करी, तवय आकाशनी पाऊस पाडा, अनी भुमीनी आपलं फळ उगाडं. 19मना भाऊ अनी बहिणीसवन, तुमनापैकी कोणी सत्यपाईन बहीकी गया अनी त्याले कोणी माघारे फिरायं. 20#१ पेत्र ४:८तर पापी माणुसले त्याना भ्रांतीमय वाटपाईन फिरवणारा तोच त्याना जीव मरणपाईन तारी, अनं पापसनी रास झाकी अस त्यानी हाई ध्यानमा लेवाले पाहिजे.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

याकोब 5: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល