इब्री 8

8
येशु आमना प्रमुख याजक
1आमना सांगाना उद्देश हाऊ शे की, स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर शे त्याना राजासनना उजवीकडे बठेल असा प्रमुख याजक आपले शे. 2तो त्या परम पवित्रस्थानना अनी ज्याले माणुसनी नही तर देवनी बनाडेल खरा मंडपना प्रमुख याजक शे.
3प्रत्येक प्रमुख याजक दानं अनी यज्ञपशु हाई अर्पण कराकरता नेमेल ऱ्हास, अनी त्यानाजोडे बी अर्पण कराकरता काहीतरी असाले पाहिजे हाई आवश्यक शे. 4तो जर पृथ्वीवर असता तर याजक नही राहता, कारण यहूदी नियमशास्त्रप्रमाणे दानं अर्पण करनारा याजक शेतस. 5त्या याजक स्वर्गीय वस्तुसनी प्रतिमा अनं सावली यासनी सेवा करतस, तसच मोशे बी मंडप करणार व्हता, तवय देव त्याले म्हणस, “पर्वतवर तुले दखाडेल नमुनाप्रमाणे सर्व वस्तु बनाडानी सावधगिरी ठेव.” 6पण आते येशुले आखो श्रेष्ठ याजकपण मिळेल शे, कारण तो एक चांगला वचनावर स्थापेल अधिक चांगला करारना मध्यस्थी शे.
7कारण तो पहिला करार निर्दोष राहता, तर दुसरानी गरज नही ऱ्हाती. 8देव त्यानाच लोकसना दोष शोधीसन म्हणस,
“परमेश्वर म्हणस, असा दिन ई राहिनात की,
त्यामा इस्त्राएलना घराना अनं यहुदाना घराना यासनासंगे मी नवा करार करसु,
9मी त्यासना पुर्वजसना हात धरीसन त्यासले मिसर देशमाईन बाहेर आनं,
तवयना करारनामायक हाऊ करार व्हवावु नही,
कारण मना करारप्रमाणे त्या ईश्वासु राहिनात नही,
अनी मी त्यासनाकडे लक्ष दिधं नही,
10तर परमेश्वर म्हणस, त्या दिन नंतर इस्त्राएलना घरानासंगे जो करार
मी करसु तो हाऊ;
मी आपला नियम त्यासना ईचारमा ठेवसु,
अनी ते त्यासना मनवर लिखसु
अनी मी त्यासना देव असा व्हसु,
अनी त्या मना लोके असा व्हतीन,
11तवय प्रत्येकजन आपला गावबंधुले,
प्रत्येक आपला भाऊ अनं बहिणीसले,
परमेश्वरले वळखा असा बोध करावु नही,
कारण त्यासनामातीन धाकलापाईन मोठापावत,
त्या सर्वा माले वळखतीन,
12कारण मी त्यासना पापसनी क्षमा करसु,
अनी त्यासना पापसनी यापुढे कधीच आठवण करावु नही.”
13त्यानी नवं अस म्हणामुये पहिले जे व्हतं ते जुनं व्हई गयं, अनी जे जुनं अनं कुजी राहीनं ते लवकर नाहीसं व्हई.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

इब्री 8: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល