उत्पती 9

9
देव नोहासंगे करार करस
1 # उत्पती 1:28 मंग देव नोहा अनं त्याना पोऱ्यासले आशिर्वाद दिसन बोलना, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा अनी पृथ्वी व्यापी टाका. 2पृथ्वीवरना सर्व पशु, आकाशमाधला सर्व पक्षी, भुमीवर रांगनारा सर्व प्राणी अनं समुद्रामाधला सर्व मासा यासले तुमना भय अनं धाक राही; त्या तुमना स्वाधीन करेल शेतस. 3सर्व संचार करनारा प्राणी तुमना अन्न व्हतीन; जसं तुमले हिरवा वनस्पती देयल शेतस त्यानाप्रमाणे सर्व काही आते तुमले देस. 4#लेवीय 7:26-27; 19:26; लेवीय 17:10-14; अनुवाद 12:16-23; 15:23 पण मासना जिवन रक्त शे, म्हणीन रक्तनासंगे मास खावानं नही. 5मी नक्कीच तुमनं रक्त म्हणजे तुमना जीवना हिसाब लिसु; सर्व पशु अनं मनुष्य दोन्हीसघाई हिसाब लिसु, मनुष्यना प्राणना बदला प्रत्येक कडतीन लिसु. 6#उत्पती 1:26; निर्गम 20:13जो कोणी मनुष्यना रक्तपात करी तेना रक्तपात मनुष्यकडीन व्हई; कारण देवनी मनुष्यले आपला प्रतिरूपमा बनाडेल शे. 7#उत्पती 1:28तुम्हीन फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीवर विपुल वंशवृध्दी करा, तिनावर बहुगुणित व्हा."
8देव नोहाले अनं त्यानासोबत त्याना पोऱ्यासले बोलना, 9"मी तुमनासंगे अनं तुमनानंतर तुमना संतानना संगे करार करी ठेवस. 10त्यानाप्रमाणे तुमनासोबत ज्या सजीव प्राणी शेतस, म्हणजे तुमनासोबत तारूमाईन बाहेर येल पक्षी, ग्रामपशु अनं पृथ्वीवरना बाकी सर्वा प्राणी यासनासंगे बी मी करार करी ठेवस. 11तुमनासंगे हाऊ करार करी ठेवस की, परत जलप्रलमा जीव नाश व्हवावुत नही, अनी पृथ्वीना नाश करनारा जलप्रलय परत कधीच व्हवावु नही. 12देव बोलना, मनामा अनी तुमनामा त्यानाप्रमाणे तुमनासंगे राहेल सर्वा सजीव प्राणीसमा पिढ्यानपिढा, युगानुयुग राहनारा जो करार मी करी ऱ्हायनु शे त्यानं हाई चिन्ह शे. 13मी ढगमा धनुष्य ठेयल शे, तो पृथ्वीना अनं मनासोबत व्हयेल करारना चिन्ह राही. 14मी पृथ्वीना वर ढग पसारसु तवय त्यामा मेघधनुष्य दखाई, 15तवय मनामा अनी तुमनामा अनं सर्वा देहधारी सजीव प्राणी यासनामा व्हयेल करार मी आठवसु, अनी यानापुढे सर्वा देहधारीसना नाश व्हई अशा जलप्रलय व्हवावु नही. 16धनुष्य ढगमा दखाई ते दखीसन मनामा अनी पृथ्वीवरना सर्वा सजीव प्राणीसमा व्हयेल युगानुयुग करेल करारनी माले आठवन राही. 17देव नोहाले बोलना, मनामा अनं पृथ्वीना सर्वा प्राणी यासनामा जो करार मी करी ठेयेल शे त्यानं हाई चिन्ह शे."
नोहा अनी त्याना परिवार
18नोहाना पोऱ्या तारूमाईन बाहेर निंघनात त्यासना नावे शेम, हाम अनं याफेथ अश व्हतात; हाम हाऊ कनानना बाप व्हता. 19ह्या तीन नोहाना पोऱ्या; यासनापाईन पृथ्वीमा लोकसना विस्तार व्हयना. 20नोहा जो शेतकरी व्हता, तो पहिला माणुस व्हयना ज्यानी द्राक्षमळा लावा. 21तो द्राक्षरस पिसन मस्त व्हयना अनी आपला तंबुमा उघडानागडा व्हईसन पडना. 22#गणना 20:13तवय कनानना बाप हाम यानी आपला बापले उघडा नंगा दखीसन आपला दोन्ही भाऊ ज्या बाहेर व्हतात त्यासले हाई सांगं. 23तवय शेम अनं याफेथ यासनी कपडा आपला खांदावर लिसन अनं पाठमोरा व्हईसन आपला बापनी नग्नता झाकी; त्यासना तोंड पाठमोरा व्हतात म्हणीन आपला बापनी नग्नता त्यासले दिसनी नही. 24द्राक्षरसना गुंगीमाईन सावुध व्हवावर आपला धाकला पोऱ्यानी काय करं हाई नोहाले समजनं.
25तो बोलना,
कनान शापित व्हई,
तो आपला भाऊसना दाससना दास व्हई.
26तो बोलना, शेमाचा देव यहोवा धन्य!
कनान त्याना दास व्हई.
27देव याफेथना विस्तार करी; तो शेमना तंबुमा राही; अनी कनान त्याना दास व्हई. 28नोहा जलप्रलय व्हवानंतर तिनशेपन्नास वरीस जगना. 29नोहा जोडेजोडे नऊशेपन्नास वरीस जगना, मंग तो मरण पावना.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 9: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល