उत्पती 32
32
याकोब एसावले भेटानी तयारी करस
1इकडे याकोब आपला वाट धरीसनं जाई राहिंता तवय देवदूत त्याले भेटनात. 2त्यासले दखीसनं याकोब बोलना, हाई देवना सैन्य शे, म्हणीन त्या ठिकानना नाव त्यानी महनाइम#32:2 महनाइम दोन सैनिक ठेवात.
3मंग याकोबनी सेईर देशमा म्हणजे अदोम प्रांतमा आपला भाऊ एसाव यानाकडे आपला पहिले संदेशवाहकसले धाडं. 4त्यानी त्यासले आज्ञा दिधी की, मना बंधू एसाव याले जाईसन सांगा की, आपला सेवक याकोब म्हणस, लाबाननाजोडे प्रवासी व्हईसन आजपावत ऱ्हायनु. 5तर आते मनी गुरं, गाढवं, शेरडंमेंढरंसना कळप, दास अनं दासी शेतस; मना बंधूनी मनावर कृपा व्हवाले पाहिजे म्हणीन हाऊ निरोप मी धाडी राहिनू शे. 6संदेशवाहकसनी परत ईसन याकोबले सांगं, “आम्हीन आपला बंधू एसाव याले जाईन भेटनुत; तो आपलाले भेटाले ई राहिना शे, त्यानासोबत चारशे माणसे शेतस.” 7तवय याकोब भलताच घाबरना अनी चिंतामा पडना अनी आपलासोबतना माणसे, शेरडंमेंढरं गुरं अनं उंट यासन्या त्यानी दोन टोळ्या करात. 8तो बोलना, “एसावनी ईसन एक टोळीना नाश करा तर दुसरी टोळी पळीसन वाची जाई.”
9मंग याकोब बोलना, हे परमेश्वरा, मना बाप अब्राहाम अनं इसहाक यासना देव, तू माले सांगस की, तू आपला देशले आपला भाऊबंदसमा परत जाय; मी तुना कल्याण करसु. 10तू करूणा अनं सत्यता दखाडीसन आपला दासकरता जे काही करेल शे, त्याले मी पात्र नही; मी फक्त मनी काठी लिसन हाई यार्देन नदी उतरी जायेल व्हतु, अनी आते मनाजोडे दोन टोळ्या व्हई जायेल शेतस. 11मी प्रार्थना करस की, माले मना भाऊ एसावना हाततीन सोडाव; कारण माले त्यानी भिती वाटस, अस नको व्हवाले की तो ईसन मनावर हमला करी, अनी पोऱ्यासले बी मायनासोबत मारी टाकी. 12#उत्पती 22:17तू माले वचन देयल शे की, मी तुना खरंच कल्याण करसु, अनी तुनी संतती समुद्रना वाळूना कणनामायक वाढावसु ज्यासनी मोजनी करता येस नही.
13ती रातले तो तठेच राहिना; अनी आपलाजोडे जे व्हतं त्यामाईन त्यानी आपला भाऊ एसाव यानाकरता भेट तयार करी. 14दोनशे बकऱ्या अनं वीस बोकडं, दोनशे मेंढ्या अनं तीस एडका, 15तीस दूध देनारी उंटनी अनी त्यासना पिल्ला, चाळीस गायी अनं दहा बैल, वीस गाढवी अनं दहा शिंगरं. 16या सगयासना त्यानी येगयेगळा कळप करात, अनी आपला चाकरासना स्वाधीन करीसन त्यासले सांगं, तुम्हीन कळपा कळपामा अंतर ठेईसन मनापुढे चाला. 17त्यानी सर्वासना पुढला चाकरले सांगं की, तुले मना भाऊ एसाव भेटना अनं ईचारना की, तू कोना दास शे? कोठे जाई राहिना? अनी हाई तू लई जाई राहिना शे ह्या जनावरं कोणा शेतस? 18तवय त्याले सांग की, आपला सेवक याकोब याना ह्या शेतस; त्यानी ह्या आपला बंधू एसाव याले भेट म्हणीसनं धाडेल शे; अनी दखा, तो बी आमना मांगे मांगे ई ऱ्हाईना शे. 19मंग त्यानी दुसराले तिसराले अनी बाकीना कळप हाकलनारासले तसंच आज्ञा दिसन बोलना की, जर तुमले एसाव भेटना तर अशच बोलानं. 20अनी सांगा, दखा, तुमना दास याकोब बी आमनामांगेन ई ऱ्हायना शे, याकोबले वाटनं की, पुढं भेट धाडीन त्याले शांत करा अनी मांगेतीन त्याना दर्शन लिधा तर तो आपलावर संतुष्ट व्हई. 21अस त्यानी ती भेट पुढं गयी अनं तो ती रातले तंबू करीसन राहिना.
पनिएल आठे याकोबनी करेल झुंज
22मंग तो रातलेच उठीन आपला दोन्ही बायका, दोन्ही दासी अनी अकरा पोऱ्या यासले लिसन यब्बोक नदीना उतारतीन पार गया. 23त्यानी त्यासले नदीना पलीकडे उतारी दिधं, अनी आपला सर्व काही तिकडे धाडी दिधं. 24याकोब एकलाच मांगे राहिना, तवय एक माणुस ईसन त्यानासंगे पहाट व्हस तोपावत कुस्ती खेळना. 25याकोबवर मी यशस्वी व्हवावु नही हाई दखीसन त्यानी त्याना जांघले स्पर्श करा म्हणीन याकोबनी जांघनी जागा कुस्ती कराना येळले सुजनी. 26तवय तो बोलना, “पहाट व्हई राहिनी माले जाऊ दे,” पण याकोब बोलना, “जोपावत तू माले आशिर्वाद देस नही तोपावत मी तुले जाऊ देवावू नही.” 27तवय त्यानी ईचारं, "तुना नाव काय शे?" तो बोलना, "याकोब" 28तवय त्यानी सांगं, #उत्पती 35:10"आतेपाईन तुले याकोब म्हणावुत नहीत, तर इस्त्राएल#32:28 याकोब देवसंगे लढनारा म्हणतीन, कारण तू देवनासंगे अनी मनुष्यनासंगे लढीसन यशस्वी व्हयेल शे." 29#शास्ते 13:17-18तवय याकोबनी त्याले सांगं, "कृपा करीसन माले तुनं नाव सांग" पण तो बोलना, "मनं नाव काबंर ईचारस?" मंग त्यानी त्याले तठेच आशिर्वाद दिधा. 30मंग याकोबनी त्या ठिकाणनं नाव पनिएल#32:30 पनिएल देवनं मुख अस ठेवं, कारण तो बोलना, मी देवना मुख प्रत्यक्ष दखीसन बी मना जीव वाची जायेल शे. 31तो पनिएल सोडीन जाई राहिंता तवय सकाळ व्हयनी; अनी आपली मांडीमुये लंगडा व्हईन चाली राहिंता. 32म्हणीन #32:32 याकोबना लोकेइस्त्राएल लोक जनावरंसना जांघना स्नायू आजपावत खातस नही; यानं कारण हाईच शे की, त्यानी याकोबना जांघना स्नायूले स्पर्श करा.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
उत्पती 32: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025