उत्पती 27

27
याकोबले इसहाकना आशिर्वाद भेटस
1इसहाक म्हतारा व्हयना अनी त्यानी नजर इतली कमजोर व्हयनी की, त्याले काही दखावाले लागनं नही. तवय त्यानी एक दिनले आपला मोठा पोऱ्या एसाव याले बलाईसन सांगं, की, बाळा, तो बोलना, काय बाबा? 2तो त्याले बोलना, दख, मी आते म्हतारा व्हई जायेल शे; अनी माले मरण कवय ई जाई सांगता येस नही. 3तर तू आपला हत्यार, आपला धनुष्य अनं भाता लिसन रानमा जाय अनी शिकार करीसन मनाकरता मास लई ये. 4अनी मना आवडीना स्वादिष्ट भोजन तयार करीसन आण; मी ते खासु अनी मंग मराना पहिले तुले आशिर्वाद दिसु.
5इसहाक आपला पोऱ्या एसाव यानासंगे बोली राहिंता तवय रिबका ऐकी राहिंती, मंग एसाव शिकार कराले रानमा गया. 6इकडे रिबका आपला पोऱ्या याकोब याले बोलनी, दख, मी तुना बापले तुना भाऊ एसावसंगे अश बोलतांना ऐकं की, 7शिकार करीसन स्वादिष्ट भोजन तयार करीसन आण, म्हणजे मी ते खाईन मराना पहिले तुले परमेश्वरना समक्ष तुले आशिर्वाद दिसु. 8तर मना बाळा, आते मी तुले सांगस ते ऐक; मना सांगानाप्रमाणे कर. 9आत्तेनी आत्ते कळपमा जाय अनी त्यामाईन बकरीना दोनली बच्चा लई ये; म्हणजे मी त्यासनं तुना बापनं आवडतं स्वादिष्ट जेवण बनाडसु. 10मंग ते तुना बापले लई जाय, म्हणजे तो ते जेवण खाईन मराना पहिले तुले आशिर्वाद दि. 11यावर याकोब त्यानी माय रिबकाले बोलना, दख, मना भाऊ एसाव केसाळ माणुस शे, अनी मी तर बिगर केसना माणुस शे. 12मना बाप माले कदाचित चापलीसनं दखी अनी मी त्याले फसाडी राहिनु शे अस त्याले दिसी मंग आशिर्वादना बद्लामा मी मनावर शाप लई ईसु. 13त्यानी माय त्याले बोलनी, मना बाळा, तुले शाप भेटना तर तो माले लागो; पण मना एवढं सांगनं ऐक अनं बकरीनं पिल्लासले ली ये. 14तवय त्यानी जाईसन ते आपली मायनाजोडे आणं अनी तिनी त्याना बापना आवडीना भोजन बनाडं. 15मंग रिबकानी आपला मोठा पोऱ्या एसावना उत्तम वस्त्र लिसन ज्या त्याना घरमा व्हतात, आपला धाकला पोऱ्या याकोब याले घालात. 16तिनी त्याना हातले अनं मानना गुळगुळीत भागले पिल्लासनी कातडी चिटकाडी दिधी. 17अनी आपला हातघाई बनाडेल स्वादिष्ट भोजन अनं भाकर आपला पोऱ्या याकोब याना हातमा दिधं.
18तवय याकोब आपला बापनाजोडे जाईसन बोलना, बाबा, तवय इसहाक बोलना, मी आठे शे? मना बाळा तू कोण शे? 19तवय याकोब त्याना बापले बोलना, मी तुमना मोठा पोऱ्या एसाव शे? जस तुम्हीन माले सांगेल व्हत, तसच मी करेल शे, तर उठीन बसा अनी मास आणेल शे, एवढं खा; अनी तुम्हीन माले आशिर्वाद द्या. 20तवय इसहाक आपला पोऱ्याले बोलना, मना बाळा तुले शिकार इतलं लवकर कश भेटनं? तो बोलना, आपला देव यहोवा यानी माले ते लवकर मिळु दिधं. 21मंग इसहाक याकोबले बोलना, मना बाळा, तू मनाजोडे ये; तू मना पोऱ्या एसावच शे की नही हाई माले चापलीसनं दखु दे. 22तवय याकोब आपला बाप इसहाकनाजोडे गया; तो चापलीसनं बोलना, आवाज तर याकोबना शे पण हात तर एसावना शेतस. 23त्याना हात त्याना भाऊ एसाव याना हातनासारखा केसाळ व्हतात म्हणीन त्यानी त्याले वळख नही अनी त्याले आशिर्वाद दिधा. 24तो त्याले बोलना, तू मना पोऱ्या एसावच शे ना? तो बोलना, हा, मी तोच शे. 25तवय त्यानी सांगं, भोजन मनजोडे लई ये; मी मना पोऱ्यानाद्वारा करेल शिकारना मास खासु मंग मी तुले आशिर्वाद दिसु. याकोबनी जेवण त्यानाजोडे आणं अनी त्यानी ते खादं, त्यानी त्यानाकरता द्राक्षरस बी आणा अनी त्यानी ते पिदं. 26मंग त्याना बाप इसहाक त्याले बोलना, "हे मना पोऱ्या जरासा जोडे ईसन मना मुका ले." 27त्यानी जोडे जाईन त्याना मुका लिधात; तवय त्याना वस्त्रना वास लिसन असा आशिर्वाद दिधा, "मना पोऱ्याना सुगंध त्या शेतना सुगंधनामायक शे, ज्याले परमेश्वरनी आशिर्वाद देयल शे. 28देव तुले आकाशतीन ओस अनी पृथ्वीवरनी सुपीक जमीनी अनी विपुल धान्य अनं द्राक्षरस देवो; 29#उत्पती 12:3 राज्य राज्यना लोके तुनी सेवा करोत; अनी वंशना लोके तुले नमन करोत; तू आपला भाऊबंदसना मालक हो; मायना पोऱ्या तुले नमन करोत; जो तुले शाप दि त्या सर्वा शापीत व्हवोत; अनी जो तुले आशिर्वाद दि त्या सर्वा आशिर्वादीत व्हवोत."
एसाव आशिर्वाद मांगसं
30तवय अश व्हयनं की, इसहाक याकोबले आशिर्वाद देवानं व्हवावर याकोब आपला बाप इसहाक यानाजोडेतीन जास नही तोच त्याना भाऊ एसाव शिकारवरीन वना. 31त्यानी बी स्वादिष्ट भोजन तयार करीसन आपला बापनाजोडे आणा, अनं त्याले बोलना, मना बाबानी उठीन आपला पोऱ्यानी आणेल हरणनं मास खावं, अनी माले आशिर्वाद द्यावं. 32हाई ऐकीसन त्याना बाप इसहाक त्याले बोलना, तू कोण शे? त्यानी सांगं, मी तुमना पोऱ्या, तुमना मोठा पोऱ्या एसाव शे. 33तवय इसहाक भयान थरथरीन बोलना, तर शिकार करीन आणेल मास जो मनाकडे लिसन वना, अनी तू येवाना पहिले मी ते खाईसन ज्याले आशिर्वाद दिधा तो कोण? तो आशिर्वादित व्हईच. 34एसावनी आपला बापना हाई शब्द ऐका तवय तो भलता दु:खमा रडना अनी आपला बापले बोलना, माले बी आशिर्वाद द्या. 35तो त्याले बोलना, तुना भाऊनी कपटतीन ईसन तुले भेटनारा आशिर्वाद ली गया. 36तवय एसाव बोलना, त्यानं नाव याकोब हाई बरोबरच ठेयल शे की नही? कारण त्यानी माले दोनदाव दगा देयल शे, त्यानी मना ज्येष्ठपणना आधिकार बी ली लिधा अनी आते मना आशिर्वाद बी काढी लेयल शे; तर तुम्हीन मनाकरता बी काहीच आशिर्वाद राखी ठेवं नही का? 37इसहाकनी एसावले सांगं, मी त्याले तुना मालक करी ठेयेल शे, त्याना सर्वा भाऊ त्याना सेवक करेल शेतस अनी धान्य अनं द्राक्षरस यासनायोगे त्याले मी समृध्द करेल शे; तर मना बाळा, मी तुनाकरता आते काय करू? 38#इब्री 12:17एसाव बापले बोलना, बाबा, तुमनाजोडे एकच आशिर्वाद शे का? बाबा माले बी आशिर्वाद द्या, अनी एसाव जोरजोरमा रडाले लागना.
39तवय त्याना बाप इसहाक त्याले बोलना, दख, पृथ्वीवरनी सुपीक जमीनपाईन दूरतीन आकाशमाईन दव पडस तठेन दूर तुनी वस्ती व्हई; 40#उत्पती 36:8; २ राजे 8:20 तू आपली तलवारघाई जगशी, अनं आपला भाऊसना नोकर व्हसी, तरी अश व्हई की, जवय तू निराश व्हसी तवय आपला खांदावरना त्याना जु तोडी टाकशी.
41याकोबले आपला बापनी आशिर्वाद दिधा त्यामुये एसावनी त्यानासंगे वैर धरं; एसावनी आपला मनमा सांगं, मना बापनं मरणनं दिन जोडे येल शे, त्यानानंतर मी आपला भाऊ याकोबले मारी टाकसु. 42आपला मोठा पोऱ्या एसाव यानं म्हणनं रिबकाले सांगाम वनं, तवय तिनी आपला धाकला पोऱ्या याकोब याले बलाईसन सांगं, दख, तुले मारी टाकना बेत करीसन तुना भाऊ एसाव आपला समाधान करी ली राहिना शे. 43तर मना बाळा, आते मना ऐक: ऊठ, हारान आठे मना भाऊ लाबान शे, त्यानाकडे पळी जाय, 44अनी तुना भाऊना तुनावरना राग जास तोपावत थोडा दिन त्यानाजोडे राय.
योकोब लाबानकडे जासं
45तुना भाऊना तुनावरना राग जाईसन तू त्यानासंगे जे करं त्याना त्याले विसर पडस नही तोपावत तू तठेच राय; मंग मी तुले तठेन बलाई लयसु; एकच दिनले तुम्हीन दोन्ही बी मनापाईन काबंर दूर व्हवाले पाहिजेत.
46"तवय रिबका इसहाकले बोलनी, या हेथीसन्या पोरीमुये माले मना जीव नको व्हई राहिना शे, जर याकोब बी त्या देशमाधल्या पोरीमाईन एकादी हेथी पोरनासंगे लगीन करी लिधं, तर मना जगीन काय फायदा शे?"

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 27: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល