उत्पती 18

18
इसहाकना जन्मबद्दल देवना वचन
1मंग अब्राहाम दिनना भर दुपारना येळले आपला तंबूना दारजोडे बसेल व्हता, तवय परमेश्वरनी त्याले मम्रेना पवित्र झाडमां दर्शन दिधं. 2#इब्री 13:2त्यानी आपली नजर वर करीसन दखं, तवय त्याले त्याना समोर तीन माणसं उभा राहेल दिसनात, तो आपला तंबूना दारपाईन पयत जाईसन जमीनवर पडीन त्यासले नमन करना. 3मंग तो बोलना, हे प्रभू, मनावर तुनी कृपा व्हई तर आठेन तुना दासपाईन पुढे जाऊ नको; 4थोडं पाणी आणु द्याव; तुम्हीन आपला पाय धुईसन हया झाडनाखाल आराम करा. 5तुम्हीन आपला दासकडे येल शेतस, म्हणीसन मी थोडी भाकर लयस तिना आपला जिवले आधार कर, मंग तुम्हीन पुढे जा; त्या बोलनात, जस तू बोलनास तस कर. 6तवय अब्राहाम लगेच तंबूमा साराजोडे जाईसन बोलना, तीन माप सपीठ लगेच लिसन मळ अनी त्यासन्या भाकरी कर. 7परत अब्राहाम आपला गुरांकडे पयत गया अनं त्यानी एक चांगलं वासरू निवडीसन चाकरकडे दिधं; त्यानी ते फटकामा बनाडं. 8नंतर अब्राहामनी दही, दूध अनं ते बनाडेल वासरू आणीसनं त्यासनासमोर ठेवं, अनी त्या भोजन करी राहींतात तवय तो त्यासनाजोडे झाडनाखाल उभा राहिना.
9मंग त्या त्याले बोलनात, तुनी बायको सारा कोठे शे?
तो बोलना, ती तंबूमा शे".
10 # रोम 9:9 मंग तो बोलना, पुढला वसंतरऋतुमा मी तुनाकडे परत ईसु; तवय दख, तुनी बायको सारा हिले पोऱ्या व्हई,
त्यानामांगे तंबूमा सारा हाई ऐकी राहिंती. 11अब्राहाम अनं सारा ह्या म्हातारा व्हई जायेल व्हतात अनी साराले मासिक पाळी येवानं बंद व्हई जायेल व्हतं. 12#१ पेत्र 3:6तवय सारा मनमाच हसत बोलनी; मी पुरी म्हतारी व्हई जायेल शे अनं मना धनी बी म्हतारा व्हई जायेल शे, तर हाई सुख आते माले भेटी का?
13परमेश्वर अब्राहामले बोलना, सारा काबंर हसनी? मी आते म्हतारी‍ राहीसन माले आते खरच पोऱ्या व्हई का अश ती काबंर सांगस? 14#लूक 1:37परमेश्वरले काही अशक्य शे का? पुढला वसंत ऋतुमा नेमेल येळले मी तुनाकडे परत ईसु तवय साराले पोऱ्या व्हई. 15तवय सारा हाई सांगीसन नाकारनी, मी हसनी नही; कारण ती घाबरी जायेल व्हती; पण तो बोलना, नही तू हसनीच.
सदोम नगर करता अब्राहाम प्रार्थना करस
16मंग त्या माणसे तठेन उठीसन सदोम नगरकडे जावाले निंघनात अनी अब्राहाम बी त्यासले वाटमा पोसाडाले गया. 17परमेश्वर बोलना, मी जे करनार शे ते अब्राहामपाईन कशे दपाडीसन ठेवु. 18कारण त्यानापाईन मोठा अनी समर्थ राष्ट्र उत्पन्न व्हनार शे, अनी त्यानाद्वारा पृथ्वीवरला सर्व राष्ट्र आशिर्वादीत व्हतीन. 19मी त्याले याकरता निवडेल शे की, त्यानी आपला लेकरासले अनं आपला पश्चात आपला घरनासले आज्ञा देवाले पाहिजे म्हणजे त्यासनी न्यायतीन वागीसन परमेश्वरना मार्ग आचाराले पाहिजे अनं हाई यानाकरता की, परमेश्वर जे काही अब्राहामनासंगे बोलना ते त्यासले प्राप्त व्हवाले पाहिजे. 20मंग परमेश्वर बोलना, सदोम अनं गमोरा या नगरसनाईषयी ओरड भलतीच व्हयेल शे, अनं त्यासनं पाप भयानक व्हयी जायेल शे. 21त्यामुये त्यासनाविषयी जी ओरड मना कानमा येयल शे, ते तसच शे का हाई दखाकरता मी खाल जायी राहिनु शे, तश नही राहिनं तर माले समजी जाई. 22तठेन त्या माणसे फिरीसन सदोम अनं गमोरा नगरकडे गयात; पण अब्राहाम परमेश्वरनासमोर तसच उभा राहिना. 23मंग अब्राहाम जोडे ईसन बोलना, तू दुष्टनासंगे न्यायीसना बी नाश करशी का? 24कदाचित नगरमा पन्नास न्यायीजन राहिनात, तर त्यासना बी तू नाश करशी का? त्यासनामाईन पन्नास न्यायीजनसकरता त्या नगरनी तू गय करावू नही का? 25हाई प्रकारनी गोष्ट तुनापाईन दूर राहो की, दुष्टसनासंगे न्यायीजनसना नाश करीसन न्यायीजनसनी अनं दुष्टसनी गती सारखीच व्हई अश करानं तुनापाईन दूर राहो, सर्वा पृथ्वीना न्यायधीश योग्य न्याय कराऊ नही का? 26परमेश्वर बोलना, माले सदोम नगरमा पन्नास न्यायीजन भेटनात तर मी त्यासनामुये सगया स्थळनी गय करसु. 27अब्राहाम बोलना, दख, मी ते धूळ अनं राख शे, पण प्रभुनासंगे बोलाना मी धाडस करी राहिनु शे. 28कदाचित पन्‍नासमा पाच न्यायीजन कमी राहिनात तरी त्या पाच कमी म्हणीसन तू सर्वा नगरना नाश करशी का. 29त्यानी परत सांगं, तठे फक्त चाळीसच राहिनात तर? तो बोलना, त्या चाळीसचकरता मी तश कराऊ नही. 30तवय अब्राहाम त्याले बोलना, हे प्रभु तुले राग येवाव नही ते हाई म्हणस, तठे जर तीसच राहिनात तर? तो बोलना, माले तीसच भेटनात तरी तश कराऊ नही. 31तो बोलना, प्रभुनासंगे बोलाना, मी प्रयत्न करी राहिनु शे, तठे जर फक्त वीसच राहिनात तर? तो बोलना, त्या वीसचकरता मी त्यासना नाश कराऊ नही. 32अब्राहाम बोलना, प्रभुले राग न येवो, अजुन एकदाव मी सांगस, तठे फक्त दहाच राहिनात तर? तो बोलना, त्या दहाकरता मी त्यासना नाश कराऊ नही. 33मंग अब्राहामनासंगे बोलनं व्हवावर परमेश्वर निंघी गया, अनी अब्राहाम आपला ठिकानले वापस वना.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 18: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល