गलती 1

1
1मी पौल मनाकडतीन, गलतीयामाधला मंडळीसले; मी मनुष्यकडतीन किंवा कोणता माणुसनाकडतीन बी नही, तर प्रभु येशु ख्रिस्त अनं ज्यानी त्याले मरेलमाईन ऊठाडं तो देवपिता यानाद्वारा प्रेषित व्हयेल, 2अनी मना सोबतना सर्व ईश्वासी बंधुजन यासनाकडतीन गलतीया मंडळीले सलाम, 3आपला देव जो पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त याना कडतीन तुमले कृपा अनं शांती देत राहो. 4आपला देवपिताना ईच्छाप्रमाणे आपलाले हाई दुष्ट युगमाईन सोडावाकरता तुमना आमना पापसनाबद्दल प्रभु येशु ख्रिस्तनी स्वतःले दान करा. 5देवपिताले कायम युगानुयुग गौरव राहो. आमेन.
दुसरी कोणतीच सुवार्ता नही
6माले नवल वाटस की, ज्यानी तुमले ख्रिस्तना कृपानाद्वारा पाचारण करात, त्यासनापाईन ईतलामा तुम्हीन दुसरी सुवार्ताकडे वळना शेतस. 7ती दुसरी नही; पण तुमले कोणतरी भ्रममा पाडणारा अनी ख्रिस्तनी सुवार्ता चुकीनं करानी त्यासनी ईच्छा शे. 8तर जी सुवार्ता आम्हीन तुमले सांगी तिनापेक्षा वेगळी सुवार्ता जर आम्हीन किंवा स्वर्गमाईन येल देवदूतनी सांगी, तर तो शापित राहो. 9आम्हीन सुरवातले सांगं, तसं मी आते पण परत सांगस की, जी सुवार्ता तुम्हीन स्विकारेल शे तिनापेक्षा वेगळी सुवार्ता कोणी तुमले सांगी तर तो शापित राहो 10मी मनुष्यनी की देवनी शाबासकी मिळाडाले दखी ऱ्हायनु? मी मनुष्यसले संतुष्ट कराले दखी ऱ्हायनु का? मी आत्तेपावत मनुष्यसले संतुष्ट करत राहतु तर मी ख्रिस्तना दास नही राहतु.
पौल कसा प्रेषित बनना
11कारण भाऊ अनं बहिणीसवन, मी तुमले हाई सांगस की, मी सांगेल सुवार्ता मनुष्यपाईन नही शे. 12कारण ती माले मनुष्यपाईन प्राप्त व्हयनी नही, अनी ती माले कोणी शिकाडी बी नही तर येशु ख्रिस्तना प्रकटीकरणमुये ती माले प्राप्त व्हयनी. 13#प्रेषित ८:३; २२:४,५; २६:९-११यहूदी धर्ममातील मनी पहिली वागणुक बद्दल तुम्हीन ऐकेल शे का? मी देवनी मंडळीना भलताच छळ करू अनी ती मंडळीना नाश कराना प्रयत्न करा; 14#प्रेषित २२:३अनी मना पुर्वजसंना संप्रदायबद्दल मी भलतीच आस्थामा व्हतु म्हणीसन मना लोकसमातील मना वयना बराच जणसमा मी यहूदी परंपरामा पुढे जायेल व्हतु. 15#प्रेषित ९:३-६; २२:६-१०; २६:१३-१८पण देवनी आपली कृपातीन माले जन्मना पहिलेच निवडी लिधं, अनी बलाई लिधं कारण मी त्यानी सेवा कराले पाहिजे. 16जवय त्यानी निर्णय लिधा की, मनामा आपला पोऱ्याले प्रकट करू तवय मी गैरयहूदीसमा त्याना शुभवर्तमाननी घोषणा करानी, तवय मी कोणताच मनुष्यनं मत ईचारं नही. 17अनी मना पहिले व्हई जायेल प्रेषितसकडे यरूशलेमले वर नही जाता, मी अरबस्थानमा निंघी गवु अनी तठेन दिमिष्कमा परत वनु. 18#प्रेषित ९:२६-३०मंग तीन वरीस नंतर मी पेत्रले भेटाले यरूशलेमले गवु अनं त्यानाकडे पंधरा दिन ऱ्हायनु. 19पण प्रेषितमाधला प्रभुना भाऊ याकोब यानाशिवाय माले दुसरा कोणीच भेटना नही. 20तर तुमले मी जे लिखी ऱ्हायनु ते खोटं लिखस नही, ते मी देवना समोर सांगस. 21मंग सिरिया अनं किलिकीया या प्रांतमा मी वनू. 22तवय ख्रिस्तमा व्हतात असा यहूदीयामातील मंडळीसले मी अपरिचित व्हतू. 23त्यासना ऐकामा येवढंच येल व्हता की, पहिले आपला छळ करनारा जो ईश्वासना नाश कराना प्रयत्न करे, तो आते त्यानी घोषणा करी राहीना. 24तवय त्या मनामुये देवना गौरव करू लागनात.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

गलती 1: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល