निर्गम 3

3
मोशे अनी जळतं झुडूप
1मोशे आपला सासरा मिद्द्यानी याजक इथ्रो यान्या शेळ्यामेंढ्या चारे, एक रोज तो आपला कळप लिसन जंगलना मांगे देवना डोंगर होरेब आठपावत लई गया. 2तवय परमेश्वरना दूतनी एक झुडूपमातीन अग्नीज्वालाना व्दारे त्याले दर्शन दिधं, त्यानी नजर लाईसन दखं की, अग्नीघाई झुडूप जळी राहिनं पण ते भस्म व्हयनं नही अस त्याले दखायनं. 3तवय त्यानी ईचार करा, मी तठे जाईसन दखंस की काय चमत्कार शे, ते झुडूप का बरं भस्म नही व्हई राहिनं.
4ते दखाकरता मोशे तिकडे वळना हाई परमेश्वरनी दखं अनी झुडूपमातीन देवनी त्याले हाक मारीन सांंगं, मोशे तवय तो बोलना, काय आज्ञा?
5देव त्याले बोलना, “इकडे जोडे येऊ नको, तु तुना पायमाधला जोडा काढ, कारण जी जागावर तु उभा शे ती पवित्र शे. 6मी तुना बापना देव, अब्राहामना देव, इसहाकना देव, याकोबना देव शे.” तवय मोशेनी आपलं तोंड झाकं, कारण देवकडे दखानी त्यानी हिम्मत व्हयनी नही.
7देव बोलना, मिसर देशमा ज्या मना लोके शेतस त्यासना हाल मी दखेल शे, त्यासनाकडतीन मजूरी करी लेणारा मुकडदमसना तरासमुये त्यासनी करेल आक्रोश मी ऐकेल शे, त्यासना क्लेश माले समजेल शेतस. 8त्यासले मिसरी लोकसपाईन सोडावानं अनी चांगला मोठा देशमा, दुध अनं मधन्या धारा वाही राहिन्यात असा देशमा म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी अनं यबूसी यासना देशमा त्यासले लई जावानं म्हणीसन मी उतरेल शे. 9इस्त्राएल वंशना आक्रोश मनापावत येल शे, मिसरी लोके कसा त्यासनावर जुलूम करी राहिनात हाई बी मी दखेल शे. 10तर आते चाल, मी मिसर देशमातील मना इस्त्राएल वंशना लोकसले बाहेर काढानं म्हणीसन मी तुले फारोकडे धाडी राहीनु.
11तवय मोशे देवले बोलना, “फारोकडे जाईसन इस्त्राएल लोकसले मिसर देशमातील काढी आनणारा अशा मी कोण?”
12देव बोलना, “मी तुनासंगे ऱ्हासु, मी तुले धाडं यानी तुले हाईच खूण की, तु लोकसले मिसरमातीन काढीन आणावर याच डोंगरवर तुम्हीन मनी उपासना करशात.
13 # 3:13 निर्गम 6:2,3 “तवय मोशे देवले बोलना, मी इस्त्राएल लोकसकडे जासु, दखा ‘माले तुमना पुर्वजसना देवनी तुमनाकडे धाडेल शे.’ अस त्यासले सांगं, तवय त्यासनी ईचारं, ‘त्यानं नाव काय?’ तवय मी त्यासले काय सांगु?”
14 # 3:14 प्रकटी 1:4,8 देव मोशेले बोलना, “जो मी शे तोच राहसु, तु इस्त्राएल लोकसले सांगं, ‘मी शे#3:14 मी शे मी यहोवा शे ह्यानी माले तुमनाकडे धाडेल शे.’ 15आखो त्यासले सांगं, तुमना पुर्वजसना देव, अब्राहामना देव, इसहाकना देव अनं याकोबना देव यहोवा यानी माले तुमनाकडे धाडेल शे, हाईच मनं सनातन नाव शे अनं ह्याच नावतीन पिढ्यानपिढ्या मनं स्मरण व्हई. 16तु जाय अनी इस्त्राएलना वडील लोकसले जमाडीसन सांगं, तुमना पुर्वजना देव, अब्राहामना देव, इसहाकना देव, याकोबना देव परमेश्वर यानी माले दर्शन दिसन सांगं की, मनं तुमनाकडे खरंच ध्यान येल शे अनी मिसर देशमा तुमनं काय व्हई राहीनं हाई माले समजेल शे. 17मिसर देशमातील पिळवणुक पाईन मी तुमले सोडाईसन कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी अनं यबूसी यासना देशमा, जठेन दुध अनं मधन्या धारा वाही राहिन्यात असा देशमा लई जासु, अस मी सांगेल शे.”
18तुनं सांगनं त्या ऐकतीन, मंग तु अनी इस्त्राएलसना वडील लोकं मिसर देशना राजाकडे जा अनी त्याले सांगा, इब्रीसना देव यहोवा आमले भेटेल शे, तर आमना देव यहोवा याले होमबली अर्पण करानं शे म्हणीसन आमले तीन दिवसनी वाट चालीसन जंगलमा जाऊ दे. 19पण माले माहीत शे की मिसर देशना राजा तोपावत तुमले जावू देवाव नही जोपावत त्याले सामर्थ्यशाली हात दखाडावं नही. 20मंग मी आपला हात दखाडीसन मिसर देशमा ज्या सर्व अद्भुत कृती करणार शे त्याना मारा मी त्यासनावर करसु, मंग तो तुमले जावु दि.
21“अनी ह्या लोकसवर मिसरी लोकसनी कृपा व्हई अस मी करसु, म्हणीसन तुम्हीन निंघशात तवय रिकामे हाते निंघावुत नही. 22तर तुमनी प्रत्येक बाई आपली शेजारीणी बाईपाईन अनं तिनाकडे राहणारी बाईपाईन सोने-चांदीना अलंकार अनी कपडा मांगी ली; ते तुम्हीन आपला पोऱ्या अनी पोरीसले घालशात अशा तुम्हीन मिसरी लोकसले लुटशात.”

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

निर्गम 3: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល