प्रेषित 23

23
1मंग पौल धर्मसभाकडे नजर करीसन बोलना, “इस्त्राएली भाऊसवन, मी आजपावत देवनापुढे पुरी सभ्यतातीन जिवन जगनु.” 2तवय प्रमुख याजक हनन्या यानी त्यानाजोडे उभा राहणारासले त्याना कानफटामा मारानी आज्ञा करी. 3#मत्तय २३:२७,२८तवय पौल त्याले बोलना, “हे चुना लायेल भिंत, तुले देव मारी, तु नियमशास्त्रप्रमाणे मना न्याय कराले बठनात तरी नियमशास्त्रविरूध्द माले मारानी आज्ञा देस का!”
4तवय जोडे उभा राहणारा बोलनात, “देवना प्रमुख याजकनी तु निंदा करस का?”
5पौलनी सांगं, “इस्त्राएली भाऊसवन, हाऊ प्रमुख याजक शे, हाई माले माहीत नव्हतं; ‘तु आपला लोकेसना अधिकारीना विरोधमा वाईट बोलु नको’ अस शास्त्रमा लिखेल शे.”
6 # प्रेषित २६:५; फिलप्पै ३:५ तवय त्यासनामा एक भाग सदुकी अनी एक भाग परूशीसना शे, अस समजनं तवय पौल धर्मसभामा वरडीन बोलना, “भाऊसवन, मी परूशी अनी परूशीसंना पोऱ्या शे, आमनी आशा अनी मरेलसनं परत ऊठनं यानाबद्दल मनी चौकशी व्हई राहीनी!”
7तो हाई बोलीच राहींता इतलामा परूशी अनी सदुकी यासनामा गोंधळ व्हईसन लोकसभामा फुट पडनी. 8#मत्तय २२:२३; मार्क १२:१८; लूक २०:२७कारण परत जिवत व्हनं व्हस नही अनी देवदूत अनं आत्मा बी नही, अस सदुकी म्हणतस; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतस. 9तवय मोठा गोंधळ व्हयना अनी ज्या शास्त्रशिक्षक परूशीसना पक्षना व्हतात त्यासनामातीन काहीजण ऊठीसन संतापमा बोलनात, “या माणुसमा आमले काहीच वाईट दखास नही; जर आत्मा अनी देवदूत त्यानासंगे बोलना व्हई तर मंग काय?”
10अस मोठं भांडण चाली राहींत तवय त्या पौलले फाडी टाकतीन अशी भिती सेनापतीले वाटनी त्यानी शिपाईसले हुकूम करा की खाल जाईसन त्याले त्यासनामातीन सोडाईसन किल्लामा लई या.
11त्याच रातले प्रभु पौलपुढे उभा राहीसन बोलना, “धीर धर, जशी तु यरूशलेममा मनाबद्दल साक्ष दिधी तशी रोम शहरमा बी तुले देनी पडी.”
पौलना विरोधमा यहूदीसना कट
12मंग दिन उगना तवय कितलातरी यहूदी कट करीसन अनी शपथ लिसन बोलनात, “आम्हीन पौलना जीव लेतस नही तोपावत खावावुत पेवावुत नहीत.” 13हाऊ कट करनारा माणसे चाळीसपेक्षा जास्त व्हतात. 14त्या मुख्य याजक अनी वडीलमंडळ यासनाकडे ईसन बोलनात, पौलना जीव लेतस नही तोपावत आम्हीन अन्नले शिवावुत नही, अशी कडक शपथ लिसन आम्हीन स्वतःले बांधी लेयल शे. 15तर आते त्यानाबद्दल आखो काही बारकाईतीन ईचारपुस करानी शे, अस निमित्त करीसन त्याले तुमनाकडे आणा, अस तुम्हीन सभासमोर सेनापतीले समजाडा; म्हणजे पौल येस नही येस तोच आम्हीन त्याना जीव लेवाले तयार शेतस.
16हाई घात करानी बातमी पौलना भाचानी ऐकी अनी किल्लामा जाईसन त्यानी पौलले सांगं. 17तवय पौलनी एक अधिकारीले बलाईसन सांगं, “या तरूणले सेनापतीकडे लई जा, याले त्यासले काहीतरी सांगानं शे.” 18तवय अधिकारीनी त्याले सेनापतीकडे लई जाईसन सांगं, “कैदी पौल यानी माले बलाईसन ईनंती करी की, या तरूणले तुमनाकडे लई येवानं, त्याले तुमनासंगे काहीतरी बोलनं शे.”
19तवय सेनापतीनी त्याना हात धरीन त्याले एकबाजुले लई जाईसन ईचारं, “तुले माले काय सांगणं शे?”
20तो बोलना, “यहूदीसनी अशी एकी करेल शे की, पौलबद्दल आखो काही बारकाईतीन ईचारपुस कराना निमित्ततीन पौलले सकाय खाल सभामा आणानं, अशी तुमनाकडे ईनंती करानी. 21तर तुम्हीन त्यासनं ऐकानं नही, कारण चाळीसपेक्षा जास्त माणसे त्याना घात कराले टपीन बठेल शेतस; त्यासनी शपथ लेयल शे की, त्याना जीव लेवाशिवाय आपण खावावुत नही, पेवावुत नही अनी आते त्या तयार व्हईसन आपली शपथ पुरी कराले दखी राहीनात.”
22तवय तु माले हाई सांगं, “हाई कोणले सांगु नको,” अस सेनापतीनी त्या तरूणले बजाडीन सांगं अनं त्याले धाडी दिधं.
पौलले कैसरिया शहरले धाडतच
23मंग त्यानी दोन्ही अधिकारीसले बलाईन सांगं, “कैसरिया शहरमा जावाले दोनशे शिपाई, सत्तर घोडेस्वार अनी दोनशे भालेकरी असा गट रातलेच नऊ वाजता तयार करी ठेवा. 24अनी पौलले बसाडीसन फेलिक्स अधिकारीकडे संभाळीन नेवाकरता घोडस्वारसनी बी व्यवस्था करेल व्हती.” 25शिवाय त्यानी अस पत्र लिखं की, 26नामदार फेलिक्स अधिकारी यासले क्लौद्य लुसिया याना सलाम, 27या माणुसले यहूदीसनी धरं व्हतं अनी त्याना घात त्यासनाकडतीन व्हणार व्हता, इतलामा हाऊ रोमी शे, हाई समजावर मी शिपाई लई जाईसन त्याले सोडावं. 28अनी यानावर आरोप ठेवानं काय कारण व्हता हाई समजी लेवानी ईच्छातीन त्याले धर्मसभामा लई गवु. 29तवय त्यासना नियमशास्त्रमाधल्या वादग्रस्त गोष्टीसबद्दल त्यानावर काही आरोप ठेयल व्हता, पण मरणदंड किंवा कैदनी शिक्षा देवानी असा त्यानावर आरोप नव्हता, अस दखायनं. 30या माणुसना विरोधमा कट व्हवाव शे अशी माले बातमी लागताच मी त्याले तुमनाकडे धाडं, अनी यानावर दोष लावनारासले बी तुमनापुढे खटला चालाडाले सांगेल शे.
31शिपाईसनी हुकुमप्रमाणेच पौलले रातमाच अंतिपत्रिसास शहरले जवळपास लई गयात. 32अनी दुसरा दिन त्यानासंगे पुढे जावाकरता घोडस्वारसले ठिसन भालेकरी किल्लावर परत वनात. 33घोडस्वारसनी कैसरिया शहरमा जाईसन अधिकारीले पत्र दिसन पौलले त्यानापुढे उभं करं. 34त्यानी पत्र वाचीसन ईचारं, “हाऊ कोणता प्रांतना शे?” तो किलिकियाना शे अस समजनं. 35तवय त्यानी सांगं, “जवय तुनावर दोष लावनारा येतीन तवय मी तुनं ऐकसु, अनी त्याले अधिकारीना वाडामा ठेवा असा हुकूम सोडा.”

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

प्रेषित 23: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល