तर असा गोष्टी करनाराना न्याय करनारा, अनी स्वतःच त्याच गोष्टी करनारा, अरे मनुष्या, तु स्वतः देवना न्यायनिवाडामा सुटी जाशी असं समजस का? किंवा देवनी दया तुले पश्चातापनाजोडे लैजाई ऱ्हायनी हाई न वळखीन तु त्याना ममताना, क्षमाशिलताना अनी सहनशीलताना धन तुच्छ मानी ऱ्हाईनास का?