देवनी त्याले स्वप्नमा सांगं, तू सात्विक मनतीन हाई करेल शे हाई माले बी ठाऊक शे, अनी मीच तुले मनाविरूध्द पाप व्हवापाईन वाचाडेल शे; म्हणीसन मी तुले तिले हात बी लावु दिधं नही. आते त्या माणुसनी बाई त्याले वापस दे, कारण तो संदेष्टा शे; तो तुनाकरता प्रार्थना करी अनी तू वाची जाशी; पण जर तू त्यानी बाई वापस नही दिधी, तर समजी ले तू अनं तुना जितला बी लोके शेतस बठा पक्का मरतीन.